ETV Bharat / business

शक्तिकांत दास यांची आज पत्रकार परिषद; अर्थव्यवस्थेला चालना देणारे निर्णय जाहीर होणार ? - शक्तिकांत दास

भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी काय निर्णय जाहीर करणार याकडे सर्व देशाचे लक्ष लागलेले आहे.

शक्तिकांत दास
शक्तिकांत दास
author img

By

Published : Apr 17, 2020, 9:52 AM IST

मुंबई - भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास आज सकाळी १० वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. कोरोनाचे संकट उद्भवले असताना दास यांची ही दुसरी पत्रकार परिषद असणार आहे. कोरोना आणि टाळेबंदीने अर्थव्यवस्थेचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शक्तिकांत दास काही उपाय योजना जाहीर करण्याची शक्यता आहे.

शक्तिकांत दास यांनी मागील पत्रकार परिषदेत रेपो दर हा ७५ बेसिस पाँईट कमी करण्याचा निर्णय घेतला होता. बँकेच्या कर्जदारांना कर्जाचा मासिक हप्ता भरण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. टाळेबंदी वाढल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकासदर आणखी कमी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आरबीआयकडून बाजारात अधिक वित्तपुरवठा होण्यासाठी नवीन उपाययोजना जाहीर होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा-टाटाकडून मोलाची मदत; १५० कोटींच्या वैद्यकीय साहित्याचा पुरवठा

इन्स्टिट्यूट ऑफ इन्शुरन्स अँड रिस्क मॅनेजमेंटचे सहयोगी प्राध्यापक डॉ. के. श्रीनिवास राव ईटीव्ही भारतशी बोलताना म्हणाले, की आरबीआयने मार्चमधील परिस्थितीप्रमाणे उपाययोजना जाहीर केल्या होत्या. बेसल समितीने आरबीआयला ३ एप्रिलला काही शिफारसी सूचविल्या आहेत. आरबीआयच्या उपाय योजनांचा हेतू हा वित्तपुरवठा वाढविणे आणि अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन करणे असायला हवा.

हेही वाचा-दिलासादायक निर्णय घ्या; अ‌ॅम्युझमेंट पार्क उद्योगाची पंतप्रधानांकडे मागणी

भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी काय निर्णयजाहीर करणार याकडे सर्व देशाचे लक्ष लागलेले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.