ETV Bharat / business

राहुल गांधींची घसरणाऱ्या जीडीपीवरून मोदी सरकारवर टीका, म्हणाले... - Latest Rahul Gandhi news

इन्फोसिसचे संस्थापक ए. आर. नारायणमूर्ती यांनी देशाचा जीडीपी हा 1947 नंतर सर्वात कमी होईल, असे विधान केले होते. त्यावर राहुल गांधी यांना 'मोदी है तो मुमकिन हेै', असा ट्विट करत मोदी सरकारला टोला लगावला आहे.

संग्रहित-राहुल गांधी
संग्रहित-राहुल गांधी
author img

By

Published : Aug 12, 2020, 4:39 PM IST

नवी दिल्ली – काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी देशाच्या घसरणाऱ्या विकासाच्या दर्जावरून केंद्र सरकारवर उपहासात्मक टीका केली आहे. निवडणुकीत भाजपने 'मोदी है तो मुमकिन है', असा प्रचार केला होता. त्यावरून राहुल गांधी यांनी घसरणारा विकासदर म्हणजे मोदी है तो मुमकिन है, असे म्हटले आहे.

इन्फोसिसचे संस्थापक ए. आर. नारायणमूर्ती यांनी देशाचा जीडीपी हा 1947 नंतर सर्वात कमी होईल, असे विधान केले होते. त्यावर राहुल गांधी यांना 'मोदी है तो मुमकिन हेै', असा ट्विट करत मोदी सरकारला टोला लगावला आहे.

मागील आठवड्यात आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना पहिल्या सहामाहीत रिअल जीडीपी हा घसरणार असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी यापूर्वी चीनबरोबर तणाव, कोरोनाच्या समस्येवरील उपाययोजना आणि आर्थिक संकटावरून केंद्र सरकारवर टीका केली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.