मुंबई - सार्वजनिक क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये कमालीची घट झाल्याचे मनुष्यबळाचे संशोधन करणाऱ्या संस्थेच्या अहवालातून समोर आले आहे. या उलट खासगी क्षेत्रात मनुष्यबळाची संख्या ९.२ टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले आहे. तर सार्वजनिक क्षेत्रात २.६ टक्क्यांची घट झाली आहे.
कोल इंडिया आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या कंपन्या शेअर बाजारात सूचिबद्ध आहेत. यापैकी कोल इंडियाने ४.४ टक्के तर स्टेट बँकेने २.६ टक्क्यांची मनुष्यबळात कपात केली आहे. ही माहिती क्रेडिट लिऑननैस सिक्युरिटीज आशियाने अहवालात दिली आहे.
सेवा क्षेत्रातील नोकऱ्यांच्या निर्मितीचे प्रमाण ८.२ टक्क्यांनी वाढले-
सर्व महत्त्वाच्या सार्वजनिक कंपन्यामधील नोकऱ्यांची संख्या कमी झाली आहे. आर्थिक वर्ष २००७ मध्ये एकूण सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांच्या मनुष्यबळापैकी निम्मे मनुष्यबळ हे (शेअर बाजारात सूचिबद्ध असलेल्या) सार्वजनिक कंपन्यांमध्ये होते. आता, हे प्रमाण २५ टक्क्यांवर आले आहे. चालू वर्षात सेवा क्षेत्रातील नोकऱ्यांच्या निर्मितीचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत ८.२ टक्के अधिक राहिले आहे. मात्र उत्पादन क्षेत्रातील नोकऱ्यांची निर्मिती ही केवळ ०.३ टक्के राहिली आहे.
हेही वाचा-स्वदेशी जागरण मंचचा मुक्त व्यापार कराराला विरोध; देशभरात दहा दिवस करणार निदर्शने
आयटी कंपन्यांमधील नोकऱ्यांच्या निर्मितीचे प्रमाण वाढून ९ टक्के -
शेअरबाजारात सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांमधील नोकऱ्यांच्या निर्मितीचे प्रमाण हे इतर २३८ कंपन्यांहून अधिक आहे. हे प्रमाण गेल्या ३ वर्षात सर्वात अधिक आहे. आयटी कंपन्यांमधील नोकऱ्यांच्या निर्मितीचे प्रमाण वाढून ९ टक्के झाले आहे. आयटी कंपन्यांनी एकूण ०.१ दशलक्ष नोकऱ्या दिल्या आहेत. तर आउटसोर्सिंग करणाऱ्या कंपन्यांच्या नोकऱ्यांच्या निर्मितीत १८ टक्के वाढ झाली आहे. प्रत्येक नव्या ५ नोकऱ्यांमध्ये आयटी आणि आउटसोर्सिंग कंपनीमधील चार नोकऱ्या असतात, असेही अहवालात म्हटले आहे.
हेही वाचा-सरकारचा पीएमसीमध्ये थेट हस्तक्षेप नाही - निर्मला सीतारामन