मुंबई - अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत असल्याचा केंद्र सरकारने वेळोवेळी दावा केला आहे. मात्र, जनतेत अर्थव्यवस्थेसह रोजगार वाढण्यावरील विश्वास कमी होत चालला आहे. ही माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) सर्व्हेमधून समोर आली आहे.
येत्या जुलै २०१९ मध्ये उत्पन्न वाढण्याबाबत देशातील जनता कमी आशावादी असल्याचे आरबीआयच्या ग्राहक विश्वास (कन्झ्युमअर कॉन्फिडन्स) सर्व्हेमधून दिसून आले आहे. रोजगाराबाबत ५२ टक्के लोकांनी परिस्थिती अधिक वाईट झाल्याचे मत व्यक्त केले आहे. तर २८ टक्के लोकांनी रोजगाराची स्थिती सुधारल्याचे म्हटले आहे. तर १९.५ टक्के लोकांनी स्थिती 'जैसे थे' राहिल्याचे म्हटले आहे. ग्राहकांचा विश्वास गेल्या सहा वर्षात सर्वात कमी होवून सप्टेंबरमध्ये ८९.४ नोंदविण्यात आला. रोजगार, उत्पन्न आणि पर्यायी खर्चाबाबत जनतेने प्रतिकूल मत व्यक्त केले आहे.
हेही वाचा-सणासुदीला ग्राहकांना दिलासा; पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग पाचव्या दिवशी कपात
सद्यस्थितीत निर्देशांक (करन्ट सिच्युएशन इंडेक्स) हा सप्टेंबरमध्ये ८९.४ टक्के नोंदविण्यात आला. तर जुलैमध्ये ९५.७ टक्क्यांची नोंद झाली होती. रोजगार निर्मितीबाबत ५१.२ टक्के लोकांना परिस्थिती सुधारेल, असे वाटते. गेल्या वर्षभरात किमती वाढल्याचे सर्व्हेत सहभाग घेणाऱ्या लोकांना माहित होते. तसे बहुतांश लोकांनी येत्या वर्षात पुन्हा किमती वाढतील, असे गृहित धरले आहे.
हेही वाचा-देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या पेट्रोलियम कंपनीचे होणार खासगीकरण; सरकारकडून तयारी सुरू
आरबीआयने देशातील ५ हजार १९२ कुटुंबात सर्व्हे केले. या सर्व्हेत अहमदाबाद, बंगळुरू, भोपाळ, चेन्नई, दिल्ली, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, पटना आणि तिरुवनंतपुरम या शहराचा समावेश आहे.