मुंबई - मागील सरकारने उद्योग व रोजगारनिर्मितीबाबत पाच वर्षे वाया गेली. हे ओझे घेवून सरकारला कामे करावे लागणार असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत सांगितले. मागील सरकारने ३ हजारांहून अधिक सामंजस्य करार केले. प्रत्यक्षात रोजगार किती निर्माण झाले, याची माहिती श्वेतपत्रिका काढून घेणार असल्याचेही ते म्हणाले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यपालांच्या अभिभाषणानंतर राज्याच्या अर्थव्यवस्थेबाबत भूमिका मांडली. ते म्हणाले, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. राज्याचा जीडीपी किती आहे, हे कळाले पाहिजे. असा प्रसंग येणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.
राज्यपालांच्या अभिभाषणानंतर सरकारच्या कामगिरीवर बोलावे लागते, असे सांगत चव्हाण यांनी मागील सरकारच्या आर्थिक धोरणावर सडकून टीका केली. ते म्हणाले, महाराष्ट्राची अवस्था विदारक आहे. उद्योगधंद्याची अवस्था बिकट झाली आहे.
मागील सरकारने राज्यात ६५ लाख रोजगार निर्माण करणार असल्याचे आश्वासन दिले. प्रत्यक्षात राज्यात किती थेट विदेशी गुंतवणूक झाली? 'मेक इन इंडिया'मधून नवीन कारखाने कोणत्या जिल्ह्यात किती आले, याची माहिती घेणार आहोत. ही आजवर आकडेवारी मागून देण्यात आलेली नाही. सरकारने श्वेतपत्रिका काढली तर परिस्थिती लक्षात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
हेही वाचा-काँग्रेस, राष्ट्रवादीच्या जीवावर मुख्यमंत्री बनवण्याचा शब्द बाळासाहेबांना दिला होता का?
आस्थापनेतील ८३ हजार रिक्त जागा भरणार-
देशात प्रचंड बेरोजगारी वाढली आहे. गेल्या २५ वर्षात बेरोजगारीने सर्वाधिक उच्चांक गाठला आहे. मग, महाराष्ट्रात बेरोजगारी कमी झाली आहे का? राज्य सरकारने दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. राज्याच्या आस्थापनेत ८३ हजार जागा रिक्त आहेत. त्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होवू नये, यासाठी हे सरकार आस्थापनेमधील रिक्त जागा भरणार आहे.
हेही वाचा-सायरस मिस्त्री पुन्हा टाटा सन्सचे चेअरमन; एनसीएलएटीचा निकाल
पृथ्वीराज चव्हाणांनी फडणवीसांना लगावला टोला-
मिहानमध्ये एकही प्रकल्प अथवा राज्यात एकही सार्वजनिक प्रकल्प आला नाही. मागील सरकारने किती पायाभूत प्रकल्प पूर्ण केले? मुंबईमधील पायाभूत प्रकल्प किती पूर्ण केले? आमच्या सरकारने भूमीपूजन केलेली मेट्रो, ट्रान्सहार्बर लिंक ही कामे त्यांनी सुरू केली. पण एकही काम पूर्ण झाले नाही. समृद्धी महामार्गाचे काय काम केले? माजी मुख्यमंत्री फडणवीस हे गाडीत बसून विकासकाम दाखविणार असल्याचे म्हणाले. पण आमच्या मंत्र्यांवर त्यांना विकासकाम गाडीतून दाखविण्याची वेळ येणार असल्याचा टोला त्यांनी फडणवीसांना लगावला. हे सरकार रखडलेली सर्व पायाभूत प्रकल्प पूर्ण करेल, असे त्यांनी आश्वासन दिले.