नवी दिल्ली - अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात इराणच्या सैन्याचे जनरल कमांडर कासीम सुलेमानी यांच्या मृत्यूनंतर जगभरातील गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. अमेरिकेच्या हल्ल्याला इराणकडून प्रत्युत्तर दिले जाईल, अशी भीती व्यक्त होत आहे.
इराणने यापूर्वी तणावाची स्थिती निर्माण झाली असताना खनिज तेलाचा जगाला होणारा पुरवठा बंद करण्याची धमकी दिली होती. एका रात्रीत नाही, पण इराणकडून बदला घेतला जाणार आहे. त्यामुळे भू-राजकीय जोखीम वाढणार असल्याचे पेट्रोमॅट्रिक्स कन्सल्टन्सीने म्हटले आहे.
हेही वाचा-केंद्र सरकारकडून नव्या २, ६३६ इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनला मंजुरी; महाराष्ट्रात सर्वाधिक!
होरमुझ या सामुद्रधुनीतील मार्गावरून जगभरातील २० टक्के खनिज तेलाचा पुरवठा होता. या मार्गातील खनिज तेलाच्या टँकरवर इराणने यापूर्वी हल्ले केले आहेत. तर आशियामधील जपान, चीन, जपान, भारतात येणारे ८० टक्के खनिज तेल हे सामुद्रधुनीच्या मार्गातून येते. येमेन आणि इराणचा पाठिंबा असलेल्या हाउथी बंडखोरांनी सौदी अरेबियात असलेल्या सर्वात मोठ्या तेल शुद्धीकरण प्रकल्पावर हल्ले झाले होते. हा हल्ला इराणने केल्याचा अमेरिकने आरोप केला होता. तर इराणने हा आरोप फेटाळून लावला होता.
हेही वाचा-टाटा-मिस्त्री प्रकरण : कंपनी निबंधकांच्या याचिकेवरील एनसीएलएटीचा निकाल राखीव
जगभरात खनिज तेलाच्या किमती वाढल्याने इतर देशांवर मोठा परिणाम होणार आहे. विशेषत: खनिज तेलाचे आयात करणारे देश आणि जर्मनी-इटलीसारख्या उत्पादन क्षेत्रातील देशांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.