ETV Bharat / business

रोजगार कमी होण्याचे कोणतेही कारण दिसत नाही - संतोष गंगवार - noteband impact on employment

प्रत्येक नागरिकाला अधिक चांगल्या संधीच्या शोधात देशात कुठेही स्थलांतरित होण्याचा अधिकार असल्याचे संतोष गंगवार यांनी सांगितले.

Santosh  Gangwar
केंद्रीय मंत्री संतोष गंगवार
author img

By

Published : Dec 10, 2019, 8:07 PM IST

नवी दिल्ली - रोजगार कमी झाल्याचे दाखविणारे कोणतेही कारण नाही, असे केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी लोकसभेत सांगितले. नोटाबंदीमुळे नोकऱ्यांवर परिणाम झाला का?, या विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते.

नोटाबंदीनंतर आपल्या मतदारसंघातील अनेकांनी नोकऱ्या गमविल्या आहेत. यासंदर्भात सरकारने कोणती पाऊले उचलली आहेत का, असा प्रश्न तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपस्थित केला. यावर केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांनी रोजगार निर्मितीसाठी सरकार विविध योजना राबवित असल्याचेही सांगितले. प्रत्येक नागरिकाला अधिक चांगल्या संधीच्या शोधात देशात कुठेही स्थलांतरित होण्याचा अधिकार असल्याचे गंगवार यांनी सांगितले. घटना सर्व नागरिकांना मूलभूत अधिकारांची हमी देते. ते देशाच्या कोणत्याही भागात मुक्तपणे फिरू शकतात, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा-निर्गुंतवणूक ही फायदा अथवा तोट्यावर ठरत नाही - केंद्र सरकार

केंद्र सरकारने नोव्हेंबर २०१६ मध्ये नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. त्यावेळी ५०० रुपये व १ हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय अंमलात आला होता.

Intro:Body:

Dummy news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.