ETV Bharat / business

'अँजल कराबाबतचे सर्व प्रश्न सोडविण्यात आले, चिंता न करता व्यवसायावर लक्ष केंद्रित करा' - start up

चर्चेच्या प्रक्रियेतून स्टार्टअपशी संबंधात असणारे सर्व कायदेशीर मुद्दे सोडविण्यात येणार आहेत. या प्रक्रियेवर वरिष्ठ अधिकाऱ्यांची देखरेख असल्याचे सीबीडीटीचे चेअरमन पी.सी.मोडी यांनी म्हटले

सीबीडीटीचे चेअरमन पी.सी.मोडी
author img

By

Published : Jul 6, 2019, 5:59 PM IST

नवी दिल्ली - अँजल कराबाबत स्टार्टअप क्षेत्राला वाटणाऱ्या सर्व चिंतांचा निपटारा करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांनी आता कोणतीही चिंता न करता व्यवसायावर लक्ष केंद्रित करावे, असा सल्ला केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे चेअरमन पी.सी. मोडी यांनी दिला. ते वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

चर्चेच्या प्रक्रियेतून स्टार्टअपशी संबंधात असणारे सर्व कायदेशीर मुद्दे सोडविण्यात येणार आहेत. या प्रक्रियेवर वरिष्ठ अधिकाऱ्यांची देखरेख असल्याचे सीबीडीटीचे चेअरमन पी.सी.मोडी यांनी म्हटले. औद्योगिक प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार (डीपीआयआयटी) आणि सीबीडीटी विभाग स्टार्टअपशी संबंधामधील प्रश्न सोडविण्यासाठी काळजीपूर्वक प्रयत्न करत आहे.

स्टार्टअपची व्याख्या काय, त्यांचे शेअरचे मुल्यांकन आणि त्यांना मिळणारा निधी याबाबतचे मुद्दे निकालात काढण्यात आले आहेत. त्यामुळे स्टार्टअपसाठी कोणतीही चिंताजनक बाब नाही. स्टार्टअपने उदास अथवा संशयी होण्यासारखे काहीही नसल्याचे कर कुटुंबाचा प्रमुख या भूमिकेतून सांगत आहे,पी.सी. मोडी यांनी म्हटले.

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडून अप्रत्यक्ष कर विभागाचे धोरण निश्चित करण्यात येते. स्टार्टअपला देण्यात येणाऱ्या अँजल कराबाबतचे सर्व प्रश्न सोडविण्यात येतील, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करताना म्हटले होते.

Intro:Body:

Biz

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.