ETV Bharat / business

२ हजार रुपयांच्या नोटांचे चलनातील प्रमाण कमी; केंद्रीय अर्थमंत्री म्हणतात... - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन

बँकांकडून एटीएममध्ये २ हजार रुपयांच्या नोटा ठेवण्याचे प्रमाण कमी झाल्याचे समोर आले आहे. त्यावर प्रश्न विचारला असता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, माझ्या माहितीप्रमाणे बँकांना अशा सूचना देण्यात आलेल्या नाहीत.

Rs 2000 notes
२ हजार रुपयांची नोट
author img

By

Published : Feb 27, 2020, 3:45 PM IST

नवी दिल्ली - बँकांना २ हजार रुपयांच्या नोटा चलनातून काढण्याच्या सूचना दिल्या नाहीत, असा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी खुलासा केला आहे. त्या सार्वजिक बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होत्या.

बँकांकडून एटीएममध्ये २ हजार रुपयांच्या नोटा ठेवण्याचे प्रमाण कमी झाल्याचे समोर आले आहे. त्यावर प्रश्न विचारला असता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, माझ्या माहितीप्रमाणे बँकांना अशा सूचना देण्यात आलेल्या नाहीत.

हेही वाचा-निर्यात बंदी उठवल्याने कांद्याच्या भावात सुधारणा; शेतकऱ्यांकडून निर्णयाचे स्वागत

सर्वाधिक चलनमूल्य असलेल्या नोटा सुरूच राहणार आहेत. मात्र, सार्वजनिक वितरणामधून कमी होणार असल्याचे वृत्तात म्हटले होते. बँकांकडून एटीएममध्ये २ हजार रुपयांपेक्षा अधिक ५०० रुपयांच्या नोटा ठेवण्यात येतात. गेल्या वर्षी माहिती अधिकारात प्रश्न विचारला असता २ हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद असल्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेने उत्तर दिले होते. एटीएममध्ये ग्राहकांच्या सुविधेकरता कमी मूल्य असलेल्या नोटा ठेवण्याचा निर्णय बँकांनी घेतल्याचे वित्त मंत्रालयाने म्हटले होते.

हेही वाचा-अॅपल भारतात पहिले 'फ्लॅगशिप स्टोअर' २०२१ मध्ये सुरू करणार - टिम कूक

२ हजार रुपयांच्या नोटांची छपाई झाली कमी

सरकारी इंडियन बँकेने एटीएममध्ये २ हजार रुपयांची नोट वापरणार नसल्याचे जाहीर केले आहे. २ हजार रुपयांचे सुट्टे पैसे मिळताना अडचणी येतात. त्यामुळे काही बँका २ हजार रुपयांची नोटा वापरणे थांबवित असल्याचे सूत्राने सांगितले. वर्ष २०१६-१७ दरम्यान २ हजार रुपयांच्या ३,५४२.९९१ दशलक्ष नोटा छापण्यात आल्याचे आरबीआयने माहिती अधिकारात दिलेल्या उत्तरात म्हटले होते. यानंतर २ हजार रुपयांच्या छपाईमध्ये कमालीची घट झाली आहे. वर्ष २०१७-१८ मध्ये १११.५०७ दशलक्ष नोटांची छपाई झाली आहे. तर वर्ष २०१८-१९ मध्ये ४६.६९० दशलक्ष नोटांची छपाई करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.