नवी दिल्ली - जागतिक अर्थव्यवस्थेवर महामारी 'COVID 19'चा परिणाम होत आहे. मात्र, असे असले तरी सध्याच्या आकडेवारीनुसार 'COVID 19'चा अर्थव्यवस्थेवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी राज्यसभेत सांगितले.
राज्यसभेचे सदस्य वायको यांनी कोरोनाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झाला, असा प्रश्न विचारला. त्यावर ठाकूर यांनी उत्तर देताना सांगितले, की जागतिक बाजारात खनिज तेलाच्या किंमती घसरल्याने भारतीय अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होत आहे. कोरोनाचा प्रसार वाढत असताना मानवी आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. तसेच जागतिक व्यापार, उत्पादन आणि पुरवठा साखळी विस्कळित झाली आहे. कमी मागणी, कमी झालेला गुंतवणूकदारांचा विश्वास असा परिणाम झाला आहे.
हेही वाचा-येस बँकेच्या शेअरची किंमत २३ रुपयांवरून ६० रुपये; जाणून घ्या, कारण
कोरोनाचा देशातील परिणाम कमी होण्यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय हे राज्य सरकारांबरोबर काम करत आहे. भारताचा चीनबरोबरील व्यापार विस्कळित झाला आहे. दुसऱ्या टप्प्यात जागतिक अर्थव्यवस्थेचा विकासदर कमी होण्याची शक्यता आहे. असे असले, तरी व्यापार आणि देशातील उत्पादनांच्या आकडेवारीनुसार अर्थव्यवस्थेवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे दिसून आले नाही, असा ठाकूर यांनी म्हटले आहे.
हेही वाचा-पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाळूत डोके खुपसले, राहुल गांधींची टीका