झुरीच/नवी दिल्ली - स्वित्झर्लंडमधील भारतीयांचा असलेला काळा पैसा हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. हा काळा पैसा घटल्याची माहिती स्विस नॅशनल बँकेने नुकताच वार्षिक अहवालातून समोर आली आहे. सध्या काळा पैसा असलेल्या देशांच्या यादीत भारतीयांचा ७४ वा क्रमांक आहे. यापूर्वी भारताचा ७३ वा क्रमांक होता.
स्विस बँकेच्या वार्षिक सांख्यिकी अहवालात भारतामधील कंपन्या आणि इतर लोकांनी ठेवलेला पैसा कमी याची माहिती देण्यात आली आहे. या यादीत इंग्लंड पहिल्या क्रमांकावर आहे. स्विस बँकेत असणाऱ्या विदेशातील निधीपैकी इंग्लंडचा २६ टक्के निधी आहे. त्यानंतर यादीत अमेरिका, वेस्ट इंडिज, फ्रान्स आणि हाँगकाँग या देशांचा क्रमांक आहे.
स्विस बँकेकडून ५० भारतीयांना मिळणार नोटीस, अपील करण्याची शेवटची संधी
स्वित्झर्लंडने स्विस बँकेत पैसे ठेवणाऱया खातेधारकांविषयी माहिती देण्यासाठी भारत सरकारसोबत सामंजस्य करार केला आहे. स्वित्झर्लंडने असा करार अन्य देशांसोबतही केला आहे. यामुळे, स्वित्झर्लंडच्या अधिकाऱ्यांनी मार्चपासून चालू महिन्यापर्यंत जवळपास ५० भारतीय खातेधारकांना नोटीसा पाठवल्या आहेत. याबरोबरच भारत सरकारला सूचना देण्यापूर्वी खातेधारकांना अपील करण्याची एक संधी देण्यात आली आहे.