ETV Bharat / business

पंतप्रधान मोदी नीती आयोग कार्यालयात घेणार तज्ज्ञांची बैठक - पंतप्रधान बैठक

केंद्रीय अर्थसंकल्प २०२०-२१ साठी प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची तज्ज्ञांसमवेतची  बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

Prime Minister Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी
author img

By

Published : Jan 7, 2020, 1:08 PM IST

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची नीती आयोगाच्या मुख्य कार्यालयात ९ जानेवारीला बैठक घेणार आहेत. या बैठकीत पंतप्रधान अर्थव्यवस्थेच्या स्थितीबाबत चर्चा करणार आहेत. या बैठकीला नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित असणार आहेत.

पंतप्रधान हे गुरुवारी नीती आयोगाच्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. केंद्रीय अर्थसंकल्प २०२०-२१ साठी प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची तज्ज्ञांसमवेतची बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

हेही वाचा-शेअर बाजारातील फटका; गुंतवणूकदारांनी गमाविले ३ लाख कोटी रुपये

मागील बैठकीत पंतप्रधान मोदींनी कोटक महिंद्रा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय कोटक, स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्रमुख रजनीश कुमार, एचडीएफसी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आदित्य पुरी, आयटी इंडस्ट्रीचे टीव्ही मोहनदास पै, माजी वित्तीय सचिव हसमुख आढिया, टेक महिंद्राचे सीईओ सी. पी. गुरमानी यांनी सांगितले. इंटेल इंडिया महाव्यवस्थापक निवृत्ती राय आणि टीसीएसचे कार्यकारी अध्यक्ष राजेश गोपीनाथ यांची भेट घेतली होती.

हेही वाचा-अर्थव्यवस्थेला चालना देण्याकरता पंतप्रधानांची 'या' उद्योगपतींशी चर्चा

पंतप्रधान मोदींनी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची व उद्योगपतींची सोमवारी भेट घेतल्याचे बोलले जाते. मोदींनी सुमारे ६० आंत्रेप्रेन्युअर आणि एफएमसीजी, वित्त, अपारंपरिक उर्जा, हिरा, किरकोळ विक्री क्षेत्र, कापड उद्योग, एमएसएमई, स्टार्टअप्स आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगपतींची भेट घेतली आहे.

हेही वाचा-महागाईचा डोंब; सात दिवसात पेट्रोल ६० पैशांनी तर डिझेल ८३ पैशांनी महाग

दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थव्यवस्थेला चालना देण्याकरता अर्थमंत्री काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Intro:Body:

Dummy Business news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.