दुबई/नवी दिल्ली - देशात करदात्यांसाठी आधार हे पॅनकार्डला बंधनकारक करण्यात आले आहे. दुबईमध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठीही हा निर्णय लागू करण्यात आला आहे.
सौदी अरेबियाच्या माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार दुबईमधील भारतीय रहिवाशांना आधार कार्ड हे ३१ डिसेंबरपूर्वी पॅन कार्डशी जोडावे लागणार आहे. भारतात आर्थिक व्यवहार करणाऱ्या अनिवासी भारतीयाकडे आधार कार्ड आणि पॅन कार्ड दोन्ही असावे, असे सौदी अरेबिया सरकारने म्हटले आहे.
हेही वाचा-१.१३ लाख कोटी रुपयांचे बँकांमध्ये घोटाळे; सहा महिन्यातच उच्चांक
आधार कार्ड हे पॅन कार्डला जोडण्याची ३० सप्टेंबर ही अंतिम मुदत होती. ही मुदत वाढवून ३१ डिसेंबर करण्यात आली. केंद्र सरकारच्या नियमानुसार अनिवासी भारतीयांना देशामधून करपात्र उत्पन्न मिळत असेल तर पॅन कार्ड असणे बंधनकारक आहे. तसेच देशात गुंतवणूक करण्यासाठी पॅनकार्ड बंधनकारक करण्यात आले आहे.
हेही वाचा-गुंतवणुकीसह उपभोक्तता वाढविण्याचे सर्वात मोठे आव्हान - शक्तिकांत दास