ETV Bharat / business

प्राप्तिकर विवरणपत्रांच्या संख्येत ४ टक्क्यांची वाढ - Income tax return

केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये आयटीआरची मुदत ३१ ऑगस्ट होती. यामध्ये वाढ करून ३१ सप्टेंबर केली होती. सुमारे ५० लाख प्राप्तिकरदात्यांनी विवरणपत्रे भरल्याची माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) माहिती दिली आहे.

प्राप्तिकर विभाग
author img

By

Published : Sep 2, 2019, 2:49 PM IST

नवी दिल्ली - प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची शेवटची मुदत ३१ ऑगस्ट होती. या दिवशीपर्यंत ५.६५ कोटी करदात्यांनी विवरणपत्र भरली आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा प्राप्तिकर विवरणपत्र (आयटीआर) भरण्याची संख्या ४ टक्क्यांनी वाढल्याचे प्राप्तिकर विभागाने म्हटले आहे. गेल्या वर्षी ५.४२ कोटी विवरणपत्रे भरण्यात आली होती.

केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये आयटीआरची मुदत ३१ ऑगस्ट होती. यामध्ये वाढ करून ३१ सप्टेंबर केली होती. सुमारे ५० लाख प्राप्तिकरदात्यांनी विवरणपत्र भरल्याची माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) माहिती दिली आहे.

प्राप्तिकर विभागाने ३१ ऑगस्टला आयटीआर भरण्याचा विक्रम केला आहे. एकाच दिवशी ३१ ऑगस्टला ४९ लाख २९ हजार १२१ आयटीआर भरण्यात आली आहेत. करदात्यांनी २७ ऑगस्ट ते ३१ ऑगस्टदरम्यान १ कोटी ४७ लाख ८२ हजार ९५ लोकांनी ऑनलाईन प्राप्तिकर विवरणपत्रे भरली आहेत. या कालावधीत गतवर्षीच्या तुलनेत ४२ टक्के आयटीआर भरण्यात आली आहेत.

करदात्यांच्या तक्रारी दूर करण्यासाठी व ई-फायलिंग करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी प्राप्तिकर विभाग सोशल मीडियावर सक्रिय झाले होते. प्राप्तिकर विभागाकडून ऑनलाईन आयटीआरचे काम वेगाने करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. याचवेळी यंत्रणेवर २ हजार २०५ संगणकीय मॉलशिअस हल्ले झाल्याचे प्राप्तिकर विभागाने म्हटले आहे. एकूण ५.६५ कोटी विवरणपत्र भरले असताना त्यामधील ३.६१ कोटी विविरणपत्र सत्यापित (व्हेरिफाईड) करण्यात आली आहेत.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.