ETV Bharat / business

भारतीय अर्थव्यवस्थेत नकली नोटा  आणण्यासाठी डी कंपनीसह आयएसआय पुन्हा सक्रिय

author img

By

Published : Jun 1, 2019, 4:31 PM IST

भारतीय गुप्तचर विभागाच्या माहितीवरून नेपाळमध्ये पोलिसांनी बनावट नोटांचा मुख्य सूत्रधार युनुस अन्सारी याला अटक केली. अन्सारीचे आयएसआय आणि दाऊद इब्राहिमशी जवळचे संबंध असल्याचा भारतीय अधिकाऱ्यांचा दावा आहे. दाऊद हा भारतात बनावट नोटा चलनात आणण्यासाठी सर्वात मोठी भूमिका बजावत आहे

दाऊद इब्राहिम

नवी दिल्ली - बनावट नोटांतून तयार होणाऱ्या समांतर अर्थव्यवस्थेला पायबंद घालण्यासाठी मोदी सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतला होता. मात्र दाऊद कंपनीसह आएएसआय अजूनही बनावट नोटा छापण्यात सक्रिय असल्याची माहिती समोर आली आहे.

पाकिस्तानची आएसआय आणि डी कंपनी ही देशाच्या अर्थव्यवस्थेत बनावट नोटा चलनात आणत असल्याचे राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एआयए) तपासातून निष्पन्न झाले आहे.

नेपाळमध्ये मुख्य सूत्रधाराला अटक-
भारतीय गुप्तचर विभागाच्या माहितीवरून नेपाळमध्ये पोलिसांनी बनावट नोटांचा मुख्य सूत्रधार युनुस अन्सारी याला अटक केली होती. अन्सारीचे आयएसआय आणि दाऊद इब्राहिमशी जवळचे संबंध असल्याचा भारतीय अधिकाऱ्यांचा दावा आहे. दाऊद हा भारतात बनावट नोटा चलनात आणण्यासाठी सर्वात मोठी भूमिका बजावत आहे. अन्सारीसमवेत पाकिस्तानी नागरिक असलेल्या मोहम्मद अख्तर, नाडिया अन्वर आणि नसिरुद्दीनलाही अटक करण्यात आली आहे. अटकेवेळी पोलिसांनी ७ कोटींचे बनावट भारतीय चलनही जप्त केले होते.

नेपाळ-बांग्लादेशमार्गे देशात आणले जाते बनावट चलन-
अन्सारीच्या अटकेनंतर नेपाळमधून बनावट चलन देशात आणल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. हे चलन बांगलादेशातून पूर्व राज्यांच्या सीमेवरून देशात आणले जाते. बनावट चलनाच्या वितरणाची माहिती एनआएच्या विविध तपासातून समोर आली आहे.

पश्चिम बंगालमध्ये बनावट नोटा प्रकरणी आरोपीला केली होती अटक-
पश्चिम बंगालमधील आनंद विहार रेल्वेस्टेशन येथे जानेवारीत एका आरोपीला अटक करण्यात आली होती. त्याकडे बनावट १० लाख रुपयांचे चलन आढळले होते. त्या नोटा बांगलादेशमध्ये छापल्याचे आरोपीने सांगितले होते. आरोपीने दिल्लीतील वर्दळीच्या बाजारात आणि दुकानांमध्ये बनावट नोटा वितरित केल्या होत्या.

गुजरातमध्ये बनावट चलनप्रकरणी आरोपींना अटक-
गुजरातमध्येदेखील बनावट चलनप्रकरणी आरोपीविरोधात मे महिन्यात एनआयएने गुन्हा दाखल केला. गतवर्षी गुजरातमध्ये दहशतविरोधी पथकाने संजय कुमारे मोहनभाई देवडिया या आरोपीला बनावट चलनप्रकरणी अटक केली होती. एटीएसने तपास करत आणखी दोन आरोपींना अटक केली होती. ते आरोपी पश्चिम बंगालमधून चालणाऱ्या बनावट चलनाच्या रॅकेटमध्ये सहभागी असल्याची माहिती समोर आली होती.

बनावट चलन देशात आणण्याचा हा झाला आहे नवा मार्ग-
बुधवारी रात्री गुरुग्राम सेक्टर ४७ मधून पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. त्यांची चौकशी केली असता बनावट चलन देशात आणण्यासाठी पूर्व भारताची सीमा हा नवा मार्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.