मुंबई - जर देश एकमेकांना सहकार्य करण्यास संमत झाले तरच जागतिक हवामान बदलाचे आणि वित्तिय संकटाच्या समस्या सुटू शकतात. देशांनी एकटेपणा सोडावा, असे मत अर्थतज्ज्ञ आणि नोबेल साहित्यिक इरिक स्टार्क मस्कीन यांनी व्यक्त केले.
बहुतांश देश हे देशांतर्गत पाहत आहेत. त्यामुळे जागतिक सहकार्य वाढविणे सोपे नसल्याचे इरिक स्टार्क मस्कीन यांनी सांगितले. जगभरात आपण करारामधून एकत्र येवू शकतो. त्यासाठी आंतरराष्ट्रीय करार करून काबर्न उत्सर्जन सुरक्षित पातळीवर आणण्यासाठी देश वचनबद्ध होवू शकतात, असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी होण्यासाठी देशांनी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे. त्यासाठी होणारा खर्च मोठा आहे. त्यामुळे जुने कारखाने बंद होणार आहेत. त्याचा अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होणार आहे. मस्कीन यांना २००७ मध्ये अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आलेला आहे.
सुमारे १० वर्षापूर्वी १९३० नंतर सर्वात मोठे आर्थिक संकट आले होते. त्यामुळे जागतिक मंदी आली होती. यामधून काही प्रमाणात आपण अजूनही सावरलेले नाही. वित्तिय संकट थांबविणे जशी तांत्रिक समस्या आहे तशी ती राजकीय समस्या आहे. सध्या आपण आंतरराष्ट्रीय न होता राष्ट्रीय होत आहोत, हा चिंताजनक ट्रेण्ड असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.