संयुक्त राष्ट्रसंघ - जगातील सर्वात अधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ही भारताची ओळख आहे. आता, भारत हा लोकसंख्येच्या विस्फोटावर येवून ठेपल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालातून समोर आले आहे. भारत लोकसंख्येच्या प्रमाणात २०२७ पर्यंत चीनला मागे टाकणार असल्याचे अहवालात म्हटले आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाने द्विवार्षिक लोकसंख्या अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात जगातील वाढत्या लोकसंख्येचे भौगोलिक प्रदेशाप्रमाणे व देशनिहाय प्रमाण देण्यात आले आहे.
काय म्हटले आहे अहवालात-
दोन वर्षापूर्वी अंदाज केलेल्या प्रमाणाच्या तुलनेत लोकसंख्या वाढीचा दर कमी असणार आहे. जगाची लोकसंख्या २०५० पर्यंत ९.७ अब्ज होणार आहे. तर २१०० पर्यंत ११ अब्ज होणार आहे. अहवालात युरोपसह उत्तर अमेरिकेत लोकसंख्या वेगाने वाढत असल्याचा इशारा दिला लोकसंख्या वाढीचा वेग असणारे देश अनुक्रमाप्रमाणे असे आहेत. भारत- नायजेरिया-पाकिस्तान- डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ द काँगो, इथोपिया, टांझानिया, इंडोनिशिया, इजिप्त आणि अमेरिका
येत्या ३० वर्षात सध्याची ७.७ अब्ज असलेली लोकसंख्या २ अब्जाने वाढणार आहे. घटता जन्मदर आणि उंचावलेले जीवनमान यामुळे लोकसंख्येत वृद्घांचे प्रमाण वाढणार आहे. २०५० पर्यंत एकूण लोकसंख्येपैकी १६ टक्के लोकसंख्येचे वय हे ६५ वर्षांहून अधिक असणार आहे. सध्या हेच प्रमाण ९ टक्के आहे. तर युरोप आणि उत्तर अमेरिकेत ६५ वर्षांहून अधिक वृद्धांचे प्रमाण हे २५ टक्के असणार आहे.