ETV Bharat / business

महामारीत आशादायी चित्र; एप्रिल ते जून तिमाहीच्या जीडीपीत 21.1 टक्क्यांची वाढ - एप्रिल जून तिमाही जीडीपी

सध्याच्या किमतीप्रमाणे एप्रिल ते जून तिमाहीमध्ये जीडीपीत 31.7 टक्के (38.89 लाख कोटी रुपये) वाढ झाली आहे. त्यामागील तिमाहीत जीडीपीत 22.3 टक्के (51.23 लाख कोटी रुपये) वाढ झाली होती. कोरोना महामारीमुळे लागू केलेल्या बंधनामुळे अंदाजित जीडीपीवर परिणाम झाल्याचे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने म्हटले आहे.

जीडीपी
जीडीपी
author img

By

Published : Aug 31, 2021, 9:26 PM IST

Updated : Aug 31, 2021, 9:42 PM IST

नवी दिल्ली - कोरोनाच्या काळात घसरलेल्या अर्थव्यस्थेसाठी दिलासादायक बातमी आहे. देशाच्या सकल उत्पादनात (जीडीपी) चालू वर्षाच्या एप्रिल ते जूनच्या तिमाहीत 20.1 टक्क्यांची वाढ झाली आहे. मागील तिमाहीत जीडीपीत 24.4 टक्क्यांची घसरण झाली होती. जीडीपीची आकडेवारी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने प्रसिद्ध केली आहे.

मागील तिमाहीत अंदाजीत जीडीपी 32.38 लाख कोटी रुपये होता. तर प्रत्यक्षात जीडीपी हा 26.95 लाख कोटी रुपये होता. सध्याच्या किमतीप्रमाणे एप्रिल ते जून तिमाहीमध्ये जीडीपीत 31.7 टक्के (38.89 लाख कोटी रुपये) वाढ झाली आहे. त्यामागील तिमाहीत जीडीपीत 22.3 टक्के (51.23 लाख कोटी रुपये) वाढ झाली होती. कोरोना महामारीमुळे लागू केलेल्या बंधनामुळे अंदाजित जीडीपीवर परिणाम झाल्याचे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने म्हटले आहे.

हेही वाचा-सर्वोच्च न्यायालयाच्या 9 न्यायाधीशांचा शपथविधी सोहळा संपन्न, इतिहासात प्रथमच...

असा काढण्यात आला जीडीपी

  • जीडीपीची अंदाजित आकडेवारी ही विविध मंत्रालये, विभाग आणि खासगी संस्थांच्या आकडेवारीवरून घेण्यात आले आहे.
  • चालू आर्थिक वर्षाच्या कृषी उत्पादनाच्या उद्दिष्टाप्रमाणे पहिल्या तिमाहीत कृषी आणि कृषीपुरक उद्योगांमधून उत्पन्न मिळण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. हे उद्दिष्ट कृषी, सहकार आणि कृषी कल्याण विभागाने निश्चित केले होते.
  • रेल्वे, रस्ते, हवाई, जलवाहतूक अशा महत्त्वाच्या क्षेत्रांनी वाहतूक क्षेत्रात योगदान दिले. तसेच संवाद, बँकिंग आणि विमा क्षेत्रानेही जीडीपीच्या मुल्यांमध्ये योगदान दिली आहे.
  • मुंबई शेअर बाजार, निफ्टीकडील डाटाही कर आणि ई-वे बिलांसह जीडीपीच्या आकडेवारीसाठी वापरण्यात आला आहे.

हेही वाचा-न्यायाधीशांनी निकालातून बोलावे, तोंडी आदेश देऊ नयेत- सर्वोच्च न्यायालय

दरम्यान, नुकतेच मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसने आर्थिक वर्ष 2022 च्या पहिल्या तिमाहीत वास्तविक जीडीपी हा 20 टक्क्यांनी वाढेल, असा विश्वास व्यक्त केला होता. चीनचा जीडीपी 2021 मध्ये एप्रिल-जून तिमाहीत 7.9 टक्के होता.

हेही वाचा-भारत अफगाणिस्तानच्या घडामोडीत गुंग; चीनकडून हिंद महासागारात पोहोचण्याचा नवा मार्ग खुला

Last Updated : Aug 31, 2021, 9:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.