नवी दिल्ली - अर्थव्यवस्था मंदावणे ही चक्रीय प्रक्रिया असल्याचे सांगत भारतीय अर्थव्यवस्थेची मुलभूत तत्वे मजबूत असल्याचे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडकेर यांनी सांगितले. दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या मोदी सरकारने 100 दिवस पूर्ण केल्याच्या पार्श्वभूमीवर ते माध्यमांशी बोलत होते.
भारतात 2018 मध्ये थेट विदेशी गुंतवणुकीचे प्रमाण हे चीनहून अधिक होते. ही बाब अर्थव्यवस्था मजबूत असल्याचे सिद्ध करत असल्याचे प्रकाश जावडेकर म्हणाले. अर्थव्यवस्थेला मजबूत धक्का बसलेला नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
हेही वाचा-ऑटोमोबाईल क्षेत्रात मंदीचे सावट; महिंद्रासह मारुतीच्या वाहन विक्रीत ऑगस्टमध्ये घसरण
पुढे ते म्हणाले, देशाची अर्थव्यवस्था 2024 पर्यंत 5 लाख कोटी डॉलरची होवू शकणार आहे. अर्थव्यवस्था ही भक्कम पायावर उभी आहे. सरकारच्या प्रशासकीय मॉडेलमुळे अनेक नवे उद्योग येत आहेत. तसेच विदेशी गुंतवणूकदारांसाठी नियमात बदल करण्यात आला आहे. सरकारला अधिकाधिक विदेशी गुंतवणूक निधी व मागणीची (डिमांड) अपेक्षा आहे. सध्याची अर्थव्यवस्थेची स्थिती म्हणजे केवळ 'पॅच' असल्याचे ते म्हणाले.
हेही वाचा-नोटंबदी व जीएसटी सारख्या चुकीच्या निर्णयांमुळे देश मंदीच्या गर्तेत सापडला - मनमोहन सिंह
अर्थव्यवस्था मंदावल्याने देशाचा विकासदर कमी होणार नसल्याचाही त्यांनी दावा केला. गेली पाच वर्षे देशाचा विकासदर हा 7 टक्के राहिला आहे. यापुढे हा विकासदर कायम राहिल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.
हेही वाचा-'सच्ची शक्तीभरे' म्हणणाऱ्या 'पारले'ला मंदीचा फटका; १० हजार कर्मचाऱ्यांना मिळणार नारळ?
अर्थव्यवस्थेची चिंताजनक स्थिती असल्याची आकडेवारी आली आहे समोर-
- चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी ५ टक्के झाला आहे. हे गेल्या सहा वर्षातील जीडीपीचे सर्वात कमी प्रमाण आहे.
- वाहन उद्योगामध्ये सुमारे २ लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांनी नोकऱ्या गमविल्या आहेत.
- विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी भांडवली बाजारामधून निधी काढून घेण्याचे प्रमाण वाढविल्याने शेअर बाजारात सातत्याने घसरण होत आहे.