ETV Bharat / business

भारत-अमेरिकेमध्ये लवकरच व्यापारी करार होण्याची शक्यता - India USA trade

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेनिमित्त भेट घेतली. यावेळी द्विपक्षीय चर्चा करण्यात आली.

डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी भेट
author img

By

Published : Sep 25, 2019, 3:57 PM IST

संयुक्त राष्ट्रसंघ - भारत आणि अमेरिकेमध्ये व्यापारी मुद्द्याबाबत लक्षणीय प्रगती होत आहे. येत्या काळात व्यापारी करार करण्यासाठी दोन्ही देश सकारात्मक आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबरोबर अमेरिका व्यापार करार लवकरच करणार असल्याची माहिती दिली. आम्ही छान काम करत आहोत. अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी रॉबर्ट लिथिझर हे भारताबरोबर व्यापारी तडजोडी करणार आहेत. मात्र, नेमका केव्हा करार करण्यात येईल हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेनिमित्त भेट घेतली. यावेळी द्विपक्षीय चर्चा करण्यात आली. भारताने आयात शुल्क कमी करावे, यासाठी अमेरिकेकडून दबाव आणण्यात येत आहे.

हेही वाचा-ह्युस्टनला येवून उर्जा क्षेत्राबद्दल न बोलणे अशक्य - मोदी

पत्रकार परिषदेत बोलताना मोदी म्हणाले, माझ्या उपस्थितीत पेट्रोनेट कंपनीने २.५ अब्ज डॉलरचा करार केला आहे. यामधून येत्या काही वर्षात ६० अब्ज डॉलरचा व्यापार होणार आहे. त्यामधून ५० हजार नोकऱ्यांची निर्मिती होईल, हे देशासाठी महत्त्वाचे पाऊल आहे.

हेही वाचा-ह्युस्टनमधील पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर भारताला जीएसपीचा दर्जा मिळण्याची शक्यता

पेट्रोनेट ही अमेरिकेतील सर्वात मोठी भारतीय नैसर्गिक वायू कंपनी आहे. मोदींनी गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या उर्जा क्षेत्रातील कंपन्यांबरोबर ह्युस्टनमध्ये बैठक घेतली होती.

भारताचा व्यापार प्राधान्यक्रमाचा दर्जा (जीएसपी) ५ जूनला काढून घेण्यात आलेला दर्जा अमेरिका पुन्हा देण्याची शक्यता आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.