ETV Bharat / business

'गुंतवणूक आकर्षित करण्याकरता भारताला आणखी आर्थिक सुधारणा करण्याची गरज'

फेसबुक आणि गुगलसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी भारतात थेट विदेशी गुंतवणूक करण्याची घोषणा केली. त्याबाबत विचारले असता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्य प्रवक्ते गॅरी राईस यांनी प्रतिक्रिया दिली.

संग्रहित - आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
संग्रहित - आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
author img

By

Published : Jul 24, 2020, 2:27 PM IST

वॉशिंग्टन – भारताकडून उद्योगांचे वातावरण आणि व्यापारामध्ये गुंतवणूक वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, खात्रीशीर शाश्वत विकास आणि सर्वसमावेशक विकासदरासाठी भारताने आणखी आर्थिक सुधारणा कराव्यात, अशी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) अपेक्षा व्यक्त केली आहे.

फेसबुक आणि गुगलसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी भारतात थेट विदेशी गुंतवणूक करण्याची घोषणा केली. त्याबाबत विचारले असता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्य प्रवक्ते गॅरी राईस यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, की भारताने कामगार, जमीन आणि आदी सुधारणा करण्याची गरज आहे. तसेच गुंतवणुकीसाठी अतिरिक्त पायाभूत सुविधांची गरज आहे. अंशत: अर्थव्यवस्थेच्या चलनवलानात झालेली सुधारणा आणि कृषीशास्त्राच्या कामगिरीनंतरही देशाच्या आर्थिकबाबतीत जोखीम कायम आहेत.

कोरोना महामारी हा अर्थव्यवस्थेला सर्वाधिक धोका आहे. पुन्हा कोरोनाचा संसर्ग आणि त्यानंतर पुन्हा टाळेबंदीची लागणारी गरज यामधून ग्राहकांचा विश्वास कमी होवू शकतो. त्यामधून अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी वेळ लागले, अशी भीती राईस यांनी व्यक्त केली. ही स्थिती केवळ भारतासाठी नाही, तर अनेक देशांसाठी स्थिती लागू होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.