नवी दिल्ली - जागतिक भूक निर्देशांकाच्या (जीएचआय) ११७ देशांमध्ये भारताचा १०२ वा क्रमांक आहे. नेपाळ, पाकिस्तान आणि बांगलादेशहून अधिक भारताची भूक निर्देशांकात खराब कामगिरी आहे. ही माहिती दोन आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थांनी प्रसिद्ध केली आहे.
भारताचा २०१४ मध्ये जीएचआय यादीत ५५ वा क्रमांक आला होता. ही स्थिती आणखी गंभीर होऊन भारताचा २०१९ मध्ये १२० वा क्रमांक आला आहे. जागतिक भूक निर्देशांकाचा अहवाल तयार करण्यासाठी विविध ११७ देशांमध्ये नमुने घेण्यात आले आहेत. हा वार्षिक अहवाल आयर्लंड कन्सर्न वर्ल्डवाईल्ड आणि जर्मनीच्या वेल्थहंगरलाईफने प्रसिद्ध केला आहे.
हेही वाचा - गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ : मुख्य आर्थिक सल्लागारांचे कॉर्पोरेटला आवाहन
जागतिक भूक निर्देशांकात (ग्लोबल हंगर इंडेक्स) १०० गुण असतात. शून्य गुण ही सर्वात चांगली कामगिरी तर १०० ही सर्वात खराब कामगिरी दर्शविणारे गुण आहेत. भूकेच्या अनेक समस्यांना सामोरे जाणाऱ्या भारताने ३०.३ गुण मिळविले आहेत. यादीत पाकिस्तानचा ९४ वा, बांगलादेशचा ८८ वा तर नेपाळचा ७३ वा क्रमांक आहे. यादीत उष्मांक आणि पोषणमुल्याचाही विचार करण्यात आला आहे. उंचीच्या प्रमाणात लहान मुलांचे कमी वजन असलेला दर (वेस्टिंग रेट) हा भारतात सर्वात अधिक २०.८ टक्के असल्याचे अहवालात म्हटले आहे.
जागतिक भूक निर्देशांकाचे असे आहेत निकष
- कुपोषण
- उंचीच्या प्रमाणात कमी असलेल्या वजनाचा दर
- वयाच्या तुलनेत कमी असलेल्या वजनाचा दर (स्टनिंग)
- पाच वर्षाच्या आतमध्ये असलेल्या बालमृत्यूचे प्रमाण
हेही वाचा - पीएमसीच्या खातेदारांसंदर्भात तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाची संमती