हैदराबाद – दरवर्षी देशात 7 ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यामागे देशातील विणकरांना सन्मानित करणे व हातमाग उद्योगाचे महत्त्व समजणे हा हेतूही आहे.
केंद्र सरकारने 2015 ला 7 ऑगस्ट हा राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून जाहीर केला. सध्या, देशात सहावा राष्ट्रीय हातमाग दिन साजरा करण्यात येत आहे.
7 ऑगस्टलाच हातमाग दिन का?
स्वदेशी चळवळीची सुरुवात 7 ऑगस्ट 1905 ला सुरुवात झाली. स्वदेशीची चळवळ ही कोलकात्यामधील टाऊन हॉलमध्ये सुरुवात झाली होती. त्यामागे देशातील उत्पादनांना चालना देणे हा हेतू होता. त्यामुळे 7 ऑगस्टलाच हातमाग दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
हातमाग क्षेत्राचे महत्त्व
हातमाग उद्योगाचे देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका आहे. विणकामातून थेट 65 टक्के लोकांना रोजगार देण्यात येतो. प्राचीन भारतात कापड उद्योगाला भरभराट होती.
तामिळनाडूमध्ये शहरी हातमाग उद्योगात (21.65 टक्के), पश्चिम बंगालमध्ये (19.9 टक्के), आंध्रप्रदेशमध्ये 19 टक्के, उत्तरप्रदेशमध्ये 16.6 टक्के, मणिपूरमध्ये 8.2 टक्के असे मनुष्यबळ आहे. या राज्यांमध्ये एकूण हातमाग उद्योगातील 82.4 टक्के मनुष्यबळ आहे.
कोरोना महामारीचा हातमाग क्षेत्रावर परिणाम
कोरोना महामारीचा इतर क्षेत्रांप्रमाणे हातमाग उद्योगावर परिणाम झाला आहे. टाळेबंदीमुळे हातमाग उद्योगातील कामाच्या ऑर्डरवर परिणाम झाला आहे. किरकोळ विक्रीची दुकाने बंद झाली आहेत. त्यामुळे विक्रीमधून येणारे उत्पन्न बुडाले आहे. ही परिस्थिती आणखी वाईट होत आहे. ग्राहक नवीन ऑर्डर देत नसल्याने हातमाग उद्योग सावरण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. कारागिरांच्या विक्रीसाठी विविध खरेदी महोत्साचे आयोजन करण्यात येत असते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशा कार्यक्रमाचे किमान तीन महिने आयोजन होण्याची शक्यता नाही.
लहान कारागीर आणि उत्पादन गटांकडे आर्थिक संकटात पुरेसे भांडवल नाही. तसेच त्यांना कर्जानेही कच्चा माल खरेदी शक्य नाही. कारागीर हे अर्थव्यवस्थेच्या अनौपचारिक घटक आहे. त्यांना बँकांसह वित्तीय संस्थांकडून कर्ज मिळण्यात अडचणी येतात.