हैदराबाद - मागील दोन वर्षापासून उद्भभवलेल्या कोविड महामारीमुळे आरोग्य विम्याच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यानुसार पॉलिसीधारकांना आपल्याकडे खेचण्यासाठी विमा कंपन्यांनी सुद्धा अनेक नवं-नवीन योजना आणल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे निरोगी जीवनशैली असलेल्यांना प्रोत्साहन आणि बक्षिसे प्रदान करणारी आहे. ही योजना लोकांसाठी किती फायदेशीर ठरत आहे ते पाहुया. आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करताना विमा कंपन्या आरोग्य सेवेसाठी काही विशेष कार्यक्रम देत आहेत. लोकांना चांगल्या सवयींसह निरोगी जीवन जगण्यासाठी प्रेरित करण्यासाठी कोणत्याही अतिरिक्त भाराशिवाय हे प्रदान केले जातात.
आरोग्यदायी जीवनशैलीसाठी सवलती
पॉलिसीधारक जेव्हा त्यांच्या आरोग्याचे काळजी घेण्यासाठी व्यायाम करतात, चालतात, धावतात किंवा सायकल चालवतात तेव्हा विमा कंपन्या त्यांना काही रिवॉर्ड पॉइंट्स देतात. त्याचबरोबरप यावर आधारित, ते नूतनीकरणाच्या वेळी प्रीमियमवर सूट ही देतात. ते आउटसोर्सिंग सल्लामसलत, वैद्यकीय चाचण्या आणि औषध बिलांवर सूट देण्यासाठी देखील वापरले जाऊ शकतात. काही विमा कंपन्या विविध आरोग्य सेवा कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी या पॉइंट्सचा वापर करत सुविधा उपलब्ध करुन देतात.
पॉलिसीधारकांसाठी वेलनेस कोच उपलब्ध
काही विमा कंपन्या या विशेषतः पॉलिसीधारकांसाठी वेलनेस कोच देतात. ते पॉलिसीधारकांना आहार, व्यायाम, मानसिक आरोग्य आणि शरीराचे वजन व्यवस्थापन यासह विविध विषयांवर नियमित टिपा आणि सल्ला देतात. प्रशिक्षकांच्या सूचनांचे पालन करणाऱ्यांना विमा कंपन्या रिवॉर्ड पॉइंट देतात. तसेच इतर काही फायदे आहेत.
डॉक्टरांचे दुसरे मत मिळवा
विमा कंपन्या उपचाराबाबत दुसऱ्या डॉक्टरांचा सल्ला घेण्याची संधी देतात. हे पॉलिसीचा एक भाग म्हणून कोणत्याही अतिरिक्त प्रीमियमशिवाय ऑफर केले जाते. जेव्हा डॉक्टर रुग्णांना शस्त्रक्रियेची शिफारस करतात तेव्हा ते दुसरे मत घेऊ शकतात. या सेवांचा लाभ घेण्यासाठी विहित अर्ज भरावा लागेल आणि वैद्यकीय तपासणी अहवाल जोडावा लागेल. काहीवेळा या सेवा विमा कंपनीच्या मोबाईल अॅपद्वारे मिळू शकतात.
आपल्याा निरोगी सवयी या अशा प्रकारच्या जोखमी कमी करू शकतात
अहवालात असे म्हटले आहे की, आपल्या देशातील एकूण मृत्यूंपैकी 25 टक्के मृत्यू हे जीवनशैलीत बदल होऊन निर्माण झालेल्या आजारांमुळे होतात. तथापि, आपल्याा निरोगी सवयी या अशा प्रकारच्या जोखमी कमी करू शकतात. पॉलिसीधारकांना आरोग्य विमा पॉलिसी घेताना जीवनशैलीच्या आजारांवर अशा विशेष योजनांची निवड करण्यासाठी हे प्रोत्साहन असू शकते. विशेष म्हणजे, प्रीमियम माफ केले जातील, असा दावा लोम्बार्ड जनरल इन्शुरन्सचे प्रमुख- संजय दत्ता करतात.
Also read: COVID-19: Orphaned children aged upto 18 to get free health insurance of Rs 5 lakh