ETV Bharat / business

प्राप्तिकर विभागाचे नवीन ई-फायलिंग पोर्टल लाँच; 'या' मिळणार सुविधा

प्राप्तिकर विभागाने करदात्यांना डिजीटल स्वाक्षरी प्रमाणपत्र, वैयक्तिक मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी हे नव्याने नोंदणी करण्याची विनंती केली आहे. नवीन पोर्टलवर कंपनी, वैयक्तिक, बिगर कंपनी व टॅक्स व्यावसायिक अशी विविध वर्गवारी देण्यात आलेली आहे.

e filing portal
ई फायलिंग पोर्टल
author img

By

Published : Jun 8, 2021, 3:34 PM IST

नवी दिल्ली - प्राप्तिकर विभागाने सोमवारी नवीन ई-फायलिंग २.० लाँच केली आहे. या वेबसाईटमधून ऑनलाईन प्राप्तिकर परतवा आणि कराची रक्कम भरणे अधिक सोपे होणार आहे.

नवीन पोर्टल www.incometax.gov.in हे असणार आहे. जुने पोर्टल http://incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईटच्या जागी नवीन वेबसाईट असणार आहे. करदात्यांना विविध प्रादेशिक भाषांमध्ये नवीन वेबसाईट दिसू शकणार आहे.

हेही वाचा-खासदार नवनीत राणांचे जात प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने केले रद्द

अशी आहे नवीन वेबसाईट

  • प्राप्तिकर विभागाने करदात्यांना डिजीटल स्वाक्षरी प्रमाणपत्र, वैयक्तिक मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी हे नव्याने नोंदणी करण्याची विनंती केली आहे.
  • नवीन पोर्टलवर कंपनी, वैयक्तिक, बिगर कंपनी व टॅक्स व्यावसायिक अशी विविध वर्गवारी देण्यात आलेली आहे. करदात्यांना आयटीआर फायलिंग, परताव्याची स्थिती, कर वर्गवारी हे मेन्यूमध्ये देण्यात आलेले आहेत.
  • आयटी-ई फायलिंग पोर्टलवर वैयक्तिकपणे ८.४६ कोटी जणांनी नोंदणी केली आहे. तर मूल्यांकन वर्ष २०२०-२१ मध्ये ३.१३ कोटी आयटीआर हे ई-पडताळणी झालेले आहेत.
  • नवीन साईट कशी पाहावी, याची माहिती वेबसाईटवरील युझर मॅन्युअल, एफएक्यू आणि व्हिडिओमध्ये देण्यात आली आहे. त्याचबरोबर चॅटबोट आणि हेल्पलाईन देण्यात आली आहे.
  • वापरकर्त्याने पोर्टलमध्ये लॉग इन केल्यानंतर डॅशबोर्डमध्ये ई-प्रोसिडिंग्ज, प्रलंबित मागणी जर वार्षिक माहिती अपुरी असेल तर पेंडिग अॅक्शन टॅबमध्ये दिसणार आहे.

हेही वाचा-कचरा वेचणाऱ्याची नशेडीकडून निर्घृण हत्या; नागपुरमधील प्रकार

  • पोर्टलमधील ग्रीव्हन्स मेन्यूमध्ये करदाते हे तक्रार नोंदवू शकतात. तसेच पूर्वीच्या तक्रारीवर केलेल्या अंमलबजावणीची माहिती पाहू शकतात. करदाते हे वैयक्तिक माहिती माय प्रोफाईल मेन्यूमध्ये अपडेट करू शकतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.