नवी दिल्ली - भारतामधील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी जर्मनी महत्त्वाची भूमिका बजावू शकते, असे जर्मनीच्या अन्न आणि कृषी मंत्री जुलिया क्लॉकनेर यांनी म्हटले. जर्मनी ही शेतीतंत्र आणि पीक लागवडीनंतर व्यवस्थापनात पारंगत असल्याचेही क्लॉकनेर यांनी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना बैठकीमध्ये सांगितले.
जर्मनीचे अन्न आणि कृषी मंत्री जुलिया क्लॉकनेर यांनी देशाचे केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांची भेट घेतली. या भेटीत दोघांमध्ये कृषी क्षेत्राशी निगडीत विविध विषयावर चर्चा केली. यावेळी दोन्ही देशांनी कृषी बाजारपेठेच्या विकासात सहकार्य करण्यासाठी करार केला आहे.
-
Union Minister for Agriculture & Farmers Welfare, Rural Development and Panchayati Raj, Shri @nstomar meets German Food & Agriculture Minister, Ms. @JuliaKloeckner in New Delhi: https://t.co/x0bBePt87S pic.twitter.com/hBVweMWnIY
— MIB India (@MIB_India) November 1, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Union Minister for Agriculture & Farmers Welfare, Rural Development and Panchayati Raj, Shri @nstomar meets German Food & Agriculture Minister, Ms. @JuliaKloeckner in New Delhi: https://t.co/x0bBePt87S pic.twitter.com/hBVweMWnIY
— MIB India (@MIB_India) November 1, 2019Union Minister for Agriculture & Farmers Welfare, Rural Development and Panchayati Raj, Shri @nstomar meets German Food & Agriculture Minister, Ms. @JuliaKloeckner in New Delhi: https://t.co/x0bBePt87S pic.twitter.com/hBVweMWnIY
— MIB India (@MIB_India) November 1, 2019
हेही वाचा-नापिकीला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
भारताने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यासाठी कृषी उत्पादकता वाढविण्यावर भर देण्यात येणार असल्याचे तोमर यांनी क्लॉकनेर यांना सांगितले. शेती खर्च कमी करणे, स्पर्धात्मक बाजारपेठ विकसित करणे, शेती आणि जोडधंद्याची बाजारपेठ बळकट करण्यावर भर देण्यात येणार आहे. कृषी धोरण हे उत्पन्न केंद्रितवरून शेतकरी केंद्रित करण्यात आल्याचेही तोमर यांनी बैठकीत सांगितले.
हेही वाचा-ओल्या दुष्काळाचा बळी, सिल्लोडच्या शेतकऱ्याची पुण्यात आत्महत्या