मुंबई - राष्ट्रीय सकल उत्पादनाचा (जीडीपी) विकासदर हा ऑक्टोबर ते डिसेंबर २०१९ दरम्यान ४.५ टक्के स्थिर राहिल, असा अंदाज एसबीआयच्या अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. भारतीय उद्योग चीनमधील विविध मालांवर अवलंबून आहेत. त्यामुळे भारतावर कोरोनाचा परिणाम होणार असल्याचे या अर्थतज्ज्ञांनी म्हटले आहे.
आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये जीडीपीचा विकासदर हा ५ टक्के राहण्याची शक्यता आहे. हा गेल्या दहा वर्षातील सर्वात कमी विकासदर असणार आहे. देशामधील घटलेली मागणी आणि मंदावलेल्या जागतिक बाजाराने भारतीय निर्यातीवर झालेला परिणाम या कारणांनी विकासदर घसरणार असल्याचे एसबीआयच्या अर्थतज्ज्ञांनी म्हटले आहे.
अर्थतज्ज्ञांनी आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये जीडीपीचा विकासदर हा ४.७ टक्के राहिल असा एसबीआयच्या अर्थतज्ज्ञांनी अंदाज व्यक्त केला आहे. यापूर्वी एसबीआयच्या अर्थतज्ज्ञांनी विकासदर हा ४.६ टक्के राहिल, असा अंदाज व्यक्त केला होता.
हेही वाचा-जागतिक श्रीमंताच्या यादीत सलग तिसऱ्यांदा जेफ बेझोस अव्वल; जाणून घ्या, मुकेश अंबानींचा क्रमांक
काय म्हटले आहे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अर्थतज्ज्ञांनी म्हटले आहे?
- कोरोनाचा परिणाम होवून औषधी उद्योगांच्या निर्यातीवर परिणाम होईल.
- कापूस आणि हाँगकाँगला होणाऱ्या हिऱ्यांच्या निर्यातीवर परिणाम होणार आहे. वाहन उद्योगांना लागणारे सुट्टे भाग आणि सौर प्रकल्पासाठी लागणारे घटक यांचा चीनमधून होणारा पुरवठा विस्कळित होणार आहे.
- कोरोना उद्भवण्याचे कारण नसतानाही कुक्कुटपालन क्षेत्रावर परिणाम दिसून येत आहे.
अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने वर्ष २०१९ मध्ये १.३५ टक्के रेपो दरात कपात केली आहे. तसेच केंद्र सरकारने कॉर्पोरेट करात कपात केली आहे.
हेही वाचा-अॅसेंचरचे देशातील तिसरे इनोव्हेशन हब 'या' शहरात झाले सुरू