नवी दिल्ली - कोरोनाचा संसर्ग हा अर्थव्यवस्थेच्या विकासदरालाही (जीडीपी) होणार आहे. फिच या पतमानांकन संस्थेने भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर हा आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये ०.८ टक्के राहिल, असा अंदाज व्यक्त केला आहे.
कोरोनाच्या संकटात जागतिक मंदी आणि टाळेबंदीने भारताचा विकासदर घसरणार असल्याचे फिचने म्हटले आहे. यापूर्वी फिचने चालू आर्थिक वर्षात देशाचा विकासदर हा ४.९ टक्के राहिल, असा अंदाज व्यक्त केला होता.
फिचने एप्रिल ते जूनमध्ये देशाचा विकासदर हा चालू आर्थिक वर्षात सलग दोन तिमाहीत वृद्धीदर हा उणे राहणार असल्याचे म्हटले आहे. एप्रिल-जूनमध्ये विकासदर हा ०.२ टक्क्यांनी घसरणार (उणे) राहणार असल्याचे म्हटले आहे. तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान विकासदर हा ०.१ टक्क्यांनी घसरणार (उणे) असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. वर्ष २०२० च्या शेवटच्या तिमाहीत विकासदर हा १.४ टक्के होईल, असा फिचने अंदाज व्यक्त केला आहे.
हेही वाचा-दिलासादायक तंत्रज्ञान! स्वदेशी पीपीईची हरियाणातील विद्यापीठाकडून निर्मिती
आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये उपभोक्ते केवळ ०.३ टक्के खर्च करत आहेत. तर मागील आर्थिक वर्षात उपभोक्ते हे ५.५ टक्के खर्च करत होते. वर्ष २०२० मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेचा विकासदर हा घसरून ३.९ टक्के राहिल, असे फिचचे मुख्य अर्थतज्ज्ञ ब्रायन काउल्टनने म्हटले आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर ही सर्वात मोठी महामंदी असणार असल्याचेही काउल्टनने म्हटले आहे. कोरोनाच्या संकटामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असताना कोणताही देश अथवा प्रांत हा वाचू शकणार नसल्याचे पतमानांकन संस्थेने म्हटले आहे.
हेही वाचा-शेअर बाजार खुला होताना २५० अंशांनी वधारला निर्देशांक; 'या' कंपन्यांचे शेअर तेजीत