ETV Bharat / business

वाहनांवरील जीएसटी कमी करण्याबाबत वित्तीय मंत्रालयाची राज्य सरकारांबरोबर चर्चा सुरू

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग, एसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी वाहनांवरील जीएसटीबाबतची सरकारची भूमिका स्पष्ट केली. राज्यांबरोबर वित्तीय मंत्रालयाने चर्चा केल्यानंतर जीएसटी कमी करण्याबाबत विचार केला जाईल, असे नितीन गडकरी म्हणाले.

नितीन गडकरी,NItin Gadkari
author img

By

Published : Sep 11, 2019, 6:02 PM IST

नवी दिल्ली - मंदीमधून जात असलेल्या वाहन उद्योगाने जीएसटी कमी करण्याची मागणी केली आहे. वाहनांवरील जीएसटी कमी करण्याबाबत केंद्रीय वित्तीय मंत्रालयाची राज्य सरकारांबरोबर चर्चा सुरू असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. ते हिरो मोटरसायकल आणि अॅक्टिव्हाच्या नव्या बीएस-६ मॉडेलच्या लाँचिग कार्यक्रमात बोलत होते.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग, एसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी वाहनांवरील जीएसटीबाबतची सरकारची भूमिका स्पष्ट केली. राज्यांबरोबर वित्तीय मंत्रालयाने चर्चा केल्यानंतर जीएसटी कमी करण्याबाबत विचार केला जाईल, असे नितीन गडकरी म्हणाले. असे असले तरी, वाहनांवरील जीएसटी कमी करण्याचा अंतिम निर्णय जीएसटी परिषद घेणार आहे. देशामध्ये इथेनॉल पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी पेट्रोलियम मंत्रालय मंजुरी देण्यासाठी तयार असल्याचेही गडकरींनी यावेळी सांगितले.

हेही वाचा-वाहन उद्योगावर 'मंदीचे ग्रहण'; प्रवासी वाहनांच्या विक्रीत सलग १० व्या महिन्यात घसरण

सध्या, वाहनांवर २८ टक्के जीएसटी लागू आहे. हा जीएसटी १८ टक्के करावा, अशी वाहन उद्योगाची मागणी आहे.

हेही वाचा-'तरुण पिढी ओला व उबेरचा वापर करत असल्याने वाहन उद्योगावर परिणाम'

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.