ETV Bharat / business

'दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा विचार करत अर्थसंकल्प सादर व्हावा'

शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी म्हणाले की, प्रत्येक वेळी शेतकऱ्यांना अर्थसंकल्पातून भरीव मदत मिळण्याची अपेक्षा असते. मात्र प्रत्येक वेळी अपेक्षाभंग होतो. यावेळी तरी सरकारने शेती हिताचे निर्णय घ्यायला हवेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी
शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी
author img

By

Published : Jan 28, 2021, 5:47 PM IST

Updated : Jan 28, 2021, 6:44 PM IST

औरंगाबाद - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या खूप मोठ्या अपेक्षा असल्याचे शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी यांनी म्हटले आहे. दिल्लीच्या शेतकरी आंदोलनाचा विचार करत अर्थसंकल्प सादर करावा, अशी अपेक्षा शेतकरी नेते सूर्यवंशी यांनी व्यक्त केली.

शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी म्हणाले की, प्रत्येक वेळी शेतकऱ्यांना अर्थसंकल्पातून भरीव मदत मिळण्याची अपेक्षा असते. मात्र प्रत्येक वेळी अपेक्षाभंग होतो. यावेळी तरी सरकारने शेती हिताचे निर्णय घ्यायला हवेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाचा केंद्र सरकारने गांभीर्याने विचार करायला हवा. अर्थसंकल्पात त्या अनुषंगाने नियोजन सरकारने करणे अपेक्षित आहे. शेतीमालाला हमीभाव, निर्यातीचे असलेले प्रश्न, शेतकऱ्यांची कर्ज मुक्ती आणि वित्तीय व्यवस्था या सर्वांचा विचार अर्थसंकल्पात करायला हवा, अशी मागणी शेतकरी नेते सूर्यवंशी यांनी केली आहे.

शेतकरी आंदोलनाचा विचार करत अर्थसंकल्प सादर व्हावा

हेही वाचा-अ‌ॅपलचा भारतामधील व्यवसाय तिसऱ्या तिमाहीत दुप्पट

सरकारी बँकेतून हवी कर्ज व्यवस्था-
शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी कर्ज घेताना अनंत अडचणी येत असतात. राष्ट्रीय बँकेतून कर्जपुरवठा होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजास्तव खासगी बँकेतून कर्ज घ्यावे लागते. जास्त व्याजदरामुळे शेतकऱ्यांना कर्ज परतफेड करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे कमी व्याजदरात कर्ज शेतकऱ्यांना दिले गेले पाहिजे. शेती व्यवसाय करताना त्याला आर्थिक पाठबळ मिळू शकते. सरकारचा तरी दिलासा शेतकऱ्यांना मिळेल, अशी व्यवस्था करायला हवी अशी भावना शेतकऱ्यांनी आहे.

हेही वाचा-एअरटेल '५जी'करता तयार; हैदराबादमध्ये यशस्वी चाचणी

शेती संशोधनासाठी तरतूद करावी-
महाराष्ट्रात निसर्गावर अवलंबून असलेली पारंपारिक शेती करण्यात येत होती. मात्र, गेल्या काही वर्षात निसर्गाचे दुष्टचक्र शेती उद्धवस्त करत आहे. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. संकट नैसर्गिक असल्यामुळे त्याचा सामना करताना शेतकरी कोसळत आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी संशोधन करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळेच संशोधन करणाऱ्या संस्थांना पुरेसा निधी उपलब्ध करून दिला तरच होणारे नवीन संशोधन शेतकरी हिताचे असेल, असे मत शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.

शेती हिताचे निर्णय घेणे आवश्यक
शेतकऱ्यांसाठी हिताचे काही निर्णय घेणे आवश्यक आहे. शेतीमाल बाजारात आणल्यावर सर्वात आधी हमीभाव दिला गेला पाहिजे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक होणारे नुकसान कमी होऊ शकते. या वर्षी ओला दुष्काळ आहे. शेतीवरील वीज वापरात आलेली नाही. असे असले तरी विजेची बिल शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. सरकारने तातडीने वीजबिल कमी करण्यासाठी योजना राबवावी, अशी सूर्यवंशी अपेक्षा व्यक्त केली. सौर योजनेचा पुरेपूर फायदा शेतकऱ्यांना मिळवा, यासाठी प्रयत्न केले पाहिजे. करार पद्धतीची शेती ही शेतकऱ्यांना फायदेशीर होऊ शकते, मात्र त्यासाठी जनजागृती करायला हवी. मध्य प्रदेश आणि तेलंगणा सरकारप्रमाणे शेतकऱ्यांना रब्बी आणि खरीप पेरणीच्या आधी एकरी पाच हजाराची मदत सरकारतर्फे करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी यांनी केली.

Last Updated : Jan 28, 2021, 6:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.