नवी दिल्ली - केंद्र सरकारने विविध आर्थिक सुधारणा लागू केल्या असल्या तरी मंदीचा परिणाम कायम असल्याचे दिसून आले आहे. औद्योगिक उत्पादनात सप्टेंबरमध्ये ४.३ टक्के घसरण झाली आहे. तर गतवर्षी औद्योगिक उत्पादन सप्टेंबर २०१८ मध्ये ४.६ टक्क्यांनी वाढले होते. उत्पादन क्षेत्राच्या सुमार कामगिरीने औद्योगिक उत्पादनात घसरण झाल्याचे सरकारी आकडेवारीतून समोर आले आहे.
कारखान्यामधील उत्पादनाचे मापन हे औद्योगिक उत्पादन निर्देशांकात (आयआयपी) करण्यात येते. सध्या, देशाचे उत्पादन क्षेत्र मंदीमधून जात आहे. सप्टेंबरमध्ये उत्पादन क्षेत्राचा वृद्धीदर हा ३.९ टक्के घसरला आहे. तर गतवर्षी सप्टेंबरमध्ये उत्पादन क्षेत्राचा ४.८ टक्के हा वृद्धीदर होता.
हेही वाचा-ई-कॉमर्स कंपन्यांविरोधात व्यापाऱ्यांचा संघर्ष; बुधवारपासून करणार देशभरात निदर्शने
वीजनिर्मितीचे उत्पादन हे सप्टेंबरमध्ये २.६ टक्क्यांनी घसरले होते. तर गतवर्षी सप्टेंबरमध्ये वीजनिर्मिती ८.२ टक्क्यांनी वाढली होती. खाणींचे उत्पादन हे सप्टेंबरमध्ये ८.५ टक्क्यांनी घसरले. तर गतवर्षी सप्टेंबरमध्ये खाणींमधील उत्पादनाचा ०.१ टक्के एवढा वृद्धीदर होता.
हेही वाचा-येत्या महिनाभर बाजारात कांद्याचा भासणार तुटवडा ; पावसाने खराब मालाची आवक