नवी दिल्ली - कोरोनाच्या फटक्यातून अजूनही देशाची अर्थव्यवस्था सावरलेली नाही. देशाच्या आठ पायाभूत क्षेत्रांच्या उत्पादनात डिसेंबरमध्ये १.३ टक्क्यांची घसरण झाली आहे. कच्चे तेल, नैसर्गिक वायू, तेलशुद्धीकरण उत्पादने, खते, स्टील आणि सिमेंटचे उत्पादन घसरण झाले आहे.
केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने आठ पायाभूत क्षेत्रांच्या उत्पादनांची आकडेवारी आज जाहीर केली आहे. डिसेंबर २०१९ मध्ये आठ पायाभूत क्षेत्रांनी ३.१ टक्के वृद्धीदर नोंदविला होता. तर डिसेंबर २०२० मध्ये आठ पायाभूत क्षेत्रांच्या उत्पादनात १.३ टक्क्यांची घसरण झाली आहे.
हेही वाचा-घसरणीचा फटका! शेअर बाजार गुंतणुकदारांच्या संपत्तीत ११.५७ लाख कोटींची घट
- डिसेंबर २०२० मध्ये कोळसा आणि वीजवगळता सर्व क्षेत्रांतील उत्पादन घसरले आहे.
- एप्रिल ते डिसेंबरमध्ये २०२०-२१ मध्ये पायाभूत क्षेत्रांचे उत्पादन हे १०.१ टक्क्यांनी घसरले आहे.
- मागील आर्थिक वर्षात याच कालावधीत या पायाभूत क्षेत्रांनी ०.६ टक्के वृद्धीदर नोंदविला होता.
- कच्चे तेल ३.६ टक्के, नैसर्गिक वायू ७.२ टक्के, तेलशुद्धीकरण उत्पादने २.८ टक्के, खते २.९ टक्के, स्टील २.७ टक्के आणि सिमेंट ९.७ टक्के असे उत्पादन घसरणीचे प्रमाण डिसेंबर २०२० मध्ये राहिले आहे.
हेही वाचा-नवीन कृषी कायद्यांमुळे मुक्त बाजाराचे नवे युग सुरू होणार-आर्थिक सर्वेक्षण
दरम्यान, आठ पायाभूत क्षेत्रांचा औद्योगिक उत्पादन निर्देशांकात ४०.२७ टक्के हिस्सा आहे. कोरोना महामारीमुळे देशातील सर्वच क्षेत्रातील औद्योगिक उत्पादनाला फटका बसला आहे.