ETV Bharat / business

पीएमसी घोटाळ्याप्रकरणी ईडीचे मुंबईत छापे ; वाधवानने राज्यातील वरिष्ठ नेत्यांना घरे दिली 'गिफ्ट'

एचडीआयएलचे चेअरमन राकेश वाधवान याने राज्यातील काही वरिष्ठ राजकीय नेत्यांना घरे भेट म्हणून दिल्याचे झडतीमध्ये आढळून आले. मात्र, या राजकीय नेत्यांची नावे ईडीकडून सांगण्यात आली नाहीत.

प्रतिकात्मक - ईडी
author img

By

Published : Oct 7, 2019, 5:59 PM IST

नवी दिल्ली - पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेतील घोटाळ्याप्रकरणी सक्त अंमलबजावणी संचालनालयाने (ई़डी) मुंबईत आज पुन्हा छापे टाकले आहेत. एचडीआयएलचे चेअरमन राकेश वाधवान आणि त्याचा मुलगा सारंग यांच्या मालकीच्या जागावर हे छापे टाकण्यात आले आहेत. राज्यातील वरिष्ठ नेत्यांना वाधवान याने घरे भेट दिल्याचे ईडीच्या अधिकाऱ्याने सांगितले.

ईडीला छाप्यादरम्यान वाधवानच्या नावाने आणखी एक जेट आणि यांत्रिकी बोट नोंद असल्याचे आढळून आले. अलिबागमध्ये वाधवान याचा २२ खोल्या असलेला मोठा बंगला आढळून आला. या बंगल्यावर लवकरच जप्ती करण्यात येईल, असे ईडीच्या अधिकाऱ्याने सांगितले. तसेच प्रवर्तकाच्या नावे आणखी एक खासगी जेट विमान असल्याचे ई़डीला आढळून आले. वाधवान यांनी राज्यातील काही वरिष्ठ राजकीय नेत्यांना घरे भेट म्हणून दिल्याचे झडतीमध्ये आढळून आले. मात्र, या राजकीय नेत्यांची नावे ईडीकडून सांगण्यात आली नाहीत.

हेही वाचा-शेअर बाजारात सलग सहाव्या दिवशी घसरण; येस बँकेचे ८ टक्क्यांनी वधारले शेअर

ईडीने राकेश आणि सारंग वाधवान यांच्या मालकीचे खासगी जेट आणि ६० कोटींचे दागिने शनिवारी जप्त केली आहेत. वाधवानची यांत्रिकी बोट जप्त करण्यासाठी मालदीवच्या प्रशासनाशी संपर्कात असल्याचे ईडीच्या अधिकाऱ्याने सांगितले. ईडीने पीएमसी बँकेचा माजी चेअरमन वारयम सिंगच्या सुमारे १० कोटींच्या बँकेतील ठेवी गोठविल्या आहेत.

हेही वाचा-रोजगाराबाबत परिस्थिती अधिक वाईट झाल्याचे ५२ टक्के जनतेचे मत : आरबीआय सर्व्हे

Intro:Body:

dummy

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.