ETV Bharat / business

ईडीचा दणका; मनी लाँड्रिगप्रकरणी एसआरस ग्रुपची २,५१० कोटींची मालमत्ता जप्त

एसआरएस ग्रुपने विविध कंपन्यांच्या नावाने बेकायदेशीर चल आणि अचल मालमत्ता मिळविल्याचे तपासातून समोर आल्याचे ईडीने म्हटले आहे.

author img

By

Published : Jan 9, 2020, 8:02 PM IST

ED
ईडी

नवी दिल्ली - सक्त अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बेकायदेशीर पैसे हस्तांतरप्रकरणी मोठी कारवाई केली आहे. ईडीने एसआरएस ग्रुपची २,५१० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. यामध्ये जमीन, व्यावसायिक प्रकल्प, शाळा, सिनेमा हॉल व बँकांमधील ठेवी आदींचा समावेश आहे.

एसआरएस ग्रुपने विविध कंपन्यांच्या नावाने बेकायदेशीर चल आणि अचल मालमत्ता मिळविल्याचे तपासातून समोर आल्याचे ईडीने म्हटले आहे. ईडीने प्राथमिक आरोपपत्राच्या आधारावर एसआरएस ग्रुपविरोधात मनी लाँड्रिगचा गुन्हा नोंदविला. त्यानंतर तपास करत अंमलबजावणी गुन्हा माहिती तक्रार (एसीआयआर) नोंदवून कारवाई केली आहे.

हेही वाचा-सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण; जाणून घ्या किंमत

एसआरएस ग्रुप विरोधात फसवणुकीसह इतर आरोपाखाली हरियाणामधील विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्यांची नोंद आहे. ईडीच्या माहितीनुसार, अनिल जिंदाल, जितेंद्र कुमार गर्ग आणि प्रवीण कुमार हे एसआरएस ग्रुपचे मुख्य प्रवर्तक आहे. त्यांच्या ३०० हून अधिक कंपन्या आहेत. दरम्यान, एसआरएस ग्रुपचा व्यवस्थापकीय संचालक जिंदाल हा फसवणुकीच्या आरोपाखाली तुरुंगात आहे.

हेही वाचा-बीएस-६ इंजिनक्षमतेची वाहने टाटा मोटर्स चालू महिन्यापासून ग्राहकांना देणार

Intro:Body:

 Dummy news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.