नवी दिल्ली - देशातील उत्पादनवाढीला प्रोत्साहन देण्यासाठी अर्थसंकल्पात मोबाईलच्या सुट्ट्या भागांवर २.५ टक्के सीमा शुल्क वाढविण्याची निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मोबाईलच्या किमती वाढणार आहेत.
केंद्रीय निर्मला सीतारामन या अर्थसंकल्पीय भाषणात म्हणाल्या की, मोबाईलचे सुट्टे भाग आणि चार्जवरील सीमा शुल्क वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे देशातील स्मार्टफोनच्या उत्पादन वाढीला चालना मिळणार आहे. देशातील इलेक्ट्रॉनिक उत्पादनात वेगाने वाढणार आहे. सध्या, आपण मोबाईलसह चार्जरची निर्यात करत आहोत. यापूर्वी मोबाईलच्या काही सुट्ट्या भागांवर शून्य टक्के सीमा शुल्क होते. यापूर्वीच केंद्र सरकारने उत्पादनवाढीसाठी सवलत योजना जाहीर केली आहे.