ETV Bharat / business

आर्थिक पॅकेज पाचवा टप्पा: सीतारामन आज सकाळी अकरा वाजता करणार घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी २० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले. त्यानंतर सलग तीन दिवस केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी चार पत्रकार परिषद घेत आर्थिक पॅकेज जाहीर केले आहेत. सीतारामन या पाचव्या टप्प्यातील अर्थसंकल्पात कोणत्या क्षेत्राला दिलासा देणारे पॅकेज जाहीर करणार आहेत, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

निर्मला सीतारामन
निर्मला सीतारामन
author img

By

Published : May 17, 2020, 9:54 AM IST

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आज सकाळी ११ वाजता आर्थिक पॅकेजचा शेवटचा पाचवा टप्पा जाहीर करणार आहेत. कोरोनाचे संकट आणि टाळेबंदी या कारणांनी विविध क्षेत्रांचे नुकसान झाले आहे. या क्षेत्रांना दिलासा देण्यासाठी यापूर्वी आर्थिक पॅकेजचे चार टप्पे जाहीर केले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी २० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले. त्यानंतर सलग चार दिवस केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषद घेत आर्थिक पॅकेज जाहीर केले आहेत. सीतारामन या पाचव्या टप्प्यातील अर्थसंकल्पात आज कोणत्या क्षेत्राला दिलासा देणारे पॅकेज जाहीर करणार आहेत, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

संबंधित बातमी वाचा-आठ क्षेत्रातील सुधारणांची घोषणा; संरक्षण क्षेत्रातील एफडीआयला ४४ टक्क्यांवरून ७४ टक्के परवानगी

  • चौथ्या टप्प्यातील आर्थिक पॅकेज

निर्मला सीतारामन यांनी आर्थिक पॅकेजच्या चौथ्या टप्प्यात शनिवारी आठ क्षेत्रांसाठी सुधारणा जाहीर केल्या आहेत. यामध्ये कोळसा, खनिज उत्खनन, संरक्षण उत्पादन, हवाई वाहतूक क्षेत्र व्यवस्थापन, उर्जा वितरण कंपन्यांचे खासगीकरण, अंतराळ आणि आण्विक उर्जा या क्षेत्रांचा समावेश आहे.

  • तिसऱ्या टप्प्यातील आर्थिक पॅकेज-

निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी तिसऱ्या टप्प्यातील कृषी केंद्रीत आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. यामध्ये कृषी उद्योगाला तत्काळ १ लाख कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे.

काही महत्त्वाच्या योजना जाहीर

  • मधुमक्षिका पालनासाठी ५०० कोटींची योजना
  • दुग्ध उत्पादन क्षेत्रासाठी १५ हजार कोटींची मदत
  • औषधी वनस्पतीच्या लागवडीसाठी ४ हजार कोटींची मदत
  • पीएम मत्स्य संपदा योजनेतून मत्स्य उद्योगासाठी २० हजार कोटींची मदत

संबंधित बातमी वाचा-आता देशात कोठेही मिळणार रेशनकार्डवर धान्य; स्थलांतरीत मजुरांना २ महिन्यांचे धान्य मोफत

  • दुसऱ्या टप्प्यातील आर्थिक पॅकेज-

स्थलांतरीत मजूरांना दोन महिन्यांचे धान्य देण्यात येणार

८ कोटी मजूरांसाठी २ महिन्यांच धान्य देण्यात येणार आहे. यासाठी सरकारने ३५ हजार कोटी रुपयांची तरतुद केली आहे. प्रत्येक व्यक्तीला ५ किलो धान्य देण्यात येणार आहे. यामध्ये १ किलो डाळीचा समावेश आहे. तसेच कोरोनामुळे माघारी परतणाऱ्या नागरिकांसाठी मनरेगा योजेनेद्वारे मदत करण्यात येणार आहे.

कामगार कायदा संहितेतही बदल करण्यात येणार

देशभरातील किमान वेतनातील तफावत दूर करण्यात येईल, अशी घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली. रात्रीचं काम करणाऱ्या महिल्यांच्या नियमावलीत बदल करण्यात येईल. गरिबांच्या फायद्यासाठी किमान वेतनात बदल करण्यात येणार आहे.

'वन नेशन वन राशन'

'एक देश एक राशनकार्ड' आता देशात कोठेही धान्य घेता येणार - निर्मला सीतारामन.

रेशन कार्डचा वापर देशात कोठेही करता येणार आहे. प्रवासी मजूरांसाठी घराची व्यवस्था. योजनेद्वारे देशात कोठेही असाल तरी धान्य घेता येणार

फेरीवाल्यांसाठी विशेष योजना

मुद्रा योजनेतून ५० हजारापर्यंत कर्ज घेणाऱ्यांना २ टक्क्यांपर्यंत व्याजातून सुट. फेरीवाल्यांना ५ हजार कोटींचे कर्ज देणार. याद्वारे ५० लाख फेरीवाल्यांना फायदा होणार. बीजभांडवल १० हजार रुपये देण्यात येणार.

संबंधित बातमी वाचा-अर्थमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेमधील ठळक मुद्दे.. लघुकुटीर उद्योगांसाठी सहा मोठ्या तरतूदी!

  • पहिल्या टप्प्यातील आर्थिक पॅकेज

अर्थमंत्रालयाकडून जाहीर होणाऱ्या १५ योजनांपैकी ६ योजना 'एमएसएमई'साठी..

  • ४५ लाख लघु उद्योगांना मिळणार दिलासा..
  • १०० कोटींपर्यंतच्या उद्योगांना कर्जामध्ये मिळणार सवलत..
  • एकूण तीन लाख कोटींची तरतूद..
  • लघुकुटीर उद्योगांसाठी तारण विरहीत कर्ज मिळणार..
  • कर्जाची मूळ रक्कम परत करण्याची अट नसणार..

संबंधित बातमी वाचा-कृषी उद्योगाला तत्काळ १ लाख कोटींचे पॅकेज जाही

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.