नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटाने अर्थव्यवस्था विस्कळित झाली आहे. अशा परिस्थितीत देशातील १३.५ कोटी जणांच्या नोकऱ्या जाण्याची भीती आहे. तर १२ कोटी लोक गरिबीत ढकलले जातील, असे एका अहवालात म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन सल्लागार कंपनी ऑर्थर डी. लिटलच्या अहवालात कोरोनोचा भारतामधील नोकऱ्यांवर सर्वात वाईट परिणाम होणार असल्याचे म्हटले आहे. यामध्ये नोकऱ्या गमाविणे, गरिबीत वाढ आणि दरडोई उत्पन्न कमी होणे अशा वाईट परिणामांचा समावेश आहे. त्याचा एकत्रित परिणाम होत देशाचे सकल उत्पन्न (जीडीपी) घसरणार असल्याचे अहवालात म्हटले आहे.
हेही वाचा-आत्मनिर्भर पॅकेज : कर्ज मर्यादा वाढविल्याने राज्यांना ४.२८ लाख कोटी मिळणार - केंद्रीय अर्थमंत्री
आर्थिक वर्ष २०२०-२१मध्ये देशाचा जीडीपी हा १०.८ टक्क्यांनी घसरणार असल्याचा अंदाज अहवालात व्यक्त केला आहे. देशातील बेरोजगारीचे प्रमाण ७.६ टक्क्यांवरून ३५ टक्के होण्याची शक्यता आहे. पंतप्रधानांचे आत्मनिर्भर भारत अभियान ही चांगली सुरुवात असल्याचे अहवालाचे प्रमुख लेखक आणि ऑर्थर डी. लिटलचे सीईओ वर्णिक चित्रण मैत्र यांनी म्हटले आहे.
हेही वाचा- ८९ टक्के लोकांचे आठवड्याचे उत्पन्न शून्य - पी. चिदंबरम