नवी दिल्ली - मंदावलेल्या अर्थव्यवस्थेत अजूनही सुधारणा झाली नसल्याचे दिसून आले आहे. महत्त्वाच्या आठ क्षेत्राच्या उत्पादनात सप्टेंबरमध्ये ५.२ टक्क्यांची घसरण झाली आहे. ही माहिती केंद्र सरकारने जाहीर केली आहे.
गतवर्षी सप्टेंबरमध्ये महत्त्वाच्या आठ क्षेत्रांचा ४.३ टक्के वृद्धीदर होता. यामध्ये कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, तेलशुद्धीकरण उत्पादने, सिमेंट, स्टील आणि विद्युत निर्मिती यांच्या उत्पादनात सप्टेंबरमध्ये घसरण झाली.
हेही वाचा-माझ्या कार्यकाळात अधिकतर भाजपचीच सत्ता; रघुरामन राजन यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांना करून दिली आठवण
गतवर्षीच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये खतनिर्मितीत ५.४ टक्के वृद्धीदर झाला आहे. तर एप्रिल-सप्टेंबर तिमाहीत महत्त्वाच्या आठ क्षेत्रांचे उत्पादन हे घसरून हे १.३ टक्के झाले होते. तर गेल्यावर्षी पहिल्या तिमाहीत महत्त्वाच्या आठ क्षेत्रांचे उत्पादन हे ५.५ टक्के होते.