नवी दिल्ली - कोरोनाचे संकट असताना देशासमोर आर्थिक आव्हान निर्माण झाले आहे. अशा स्थितीत केंद्र सरकारने नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत ४.८८ लाख कोटी रुपयांचे कर्ज घेण्याचे नियोजन केले आहे.
सरकार कोरोनाच्या संकटावर मात करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच महामारीचे आर्थिक परिणाम होवू नये, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. जास्त कर्ज घेतल्याने केंद्र सरकारला खर्चाच्या अधिक गरजा पूर्ण करता येणार आहेत.
हेही वाचा-Coronavirus : धक्कादायक... होम क्वारंटाईन होण्याऐवजी लहान मुलांवर उपचार, रूग्णालय सील
पुढील आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीमधील कर्ज हे पुढील आर्थिक वर्षाच्या एकूण कर्जापैकी ६२.२५ टक्के असणार आहे. माध्यमांशी बोलताना अर्थव्यवहार मंत्रालयाचे सचिव अतनू चक्रवर्ती यांनी चालू वर्षात ७.१ लाख कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचे सांगितले.
हेही वाचा-लोकांनी गर्दी कमी न केल्यास, प्रसंगी कठोर निर्णय घ्यावे लागतील - मुख्यमंत्री