ETV Bharat / business

केंद्रीय अर्थसंकल्प : अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कृषी क्षेत्र अत्यंत महत्त्वाचे!

author img

By

Published : Jan 24, 2020, 12:41 PM IST

डॉ. एम. जे. खान म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कृषी मालाची निर्यात दुप्पट करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. यावर काम करण्याची गरज आहे. येत्या अर्थसंकल्पात त्यावर तरतूद करण्यात येईल, अशी आशा आहे.

Dr. M. J. Khan
डॉ. एम. जे. खान

नवी दिल्ली - दुसऱ्यांदा सत्तेत आलेले मोदी सरकार दुसऱ्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला सादर करणार आहे. ईटीव्ही भारतने इंडियन चेंबर ऑफ फूड अँड अॅग्रीकल्चरचे (आयसीएफ) चेअरमन डॉ. एम. जे. खान यांच्याशी चर्चा केली. त्यांनी कृषी क्षेत्राच्या अर्थसंकल्पाविषयीच्या अपेक्षावर चर्चा केली. तसेच कृषी क्षेत्राची प्रगती कशी होईल, यावर मत व्यक्त केले.

डॉ. एम. जे. खान म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कृषी मालाची निर्यात दुप्पट करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. यावर काम करण्याची गरज आहे. येत्या अर्थसंकल्पात त्यावर तरतूद करण्यात येईल, अशी आशा आहे. भारतामधील कृषी क्षेत्राची प्रगती ही थेट देशाच्या आर्थिक प्रगतीशी निगडीत आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा विचार करता कृषी क्षेत्रासाठी नव्या योजना आणण्याची गरज आहे. तर आगामी अर्थसंकल्पात काही योजनामध्ये बदल करण्याची गरज आहे. याशिवाय पायाभूत विकासासाठी येत्या अर्थसंकल्पात तरतूद करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा-एटीएम नसले तरी मिळेल रोकड; 'फोन-पे'ने आणली 'ही' खास सेवा

जर सरकारला शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करायचे असेल तर व्यापाराला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. शेतकऱ्याला कुठेही खरेदी आणि विक्री करण्याची परवानगी देण्याची गरज आहे. एफपीओच्या योजना या इतर व्यवसायाबरोबर संलग्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. लोकप्रिय योजनांपेक्षा तांत्रिक गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे. तसेच त्या पद्धतीने तरतूद करायला हवी, असेही डॉ. एम. जे. खान यांनी सांगितले.

हेही वाचा-डोनाल्ड ट्रम्प यांचा अजब दावा, चीन-भारताप्रमाणे अमेरिकाही विकसनशील देश!

Intro:Body:

Dummy Business news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.