नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत आहेत. कोरोना महामारीचा मोठा फटका बांधकाम क्षेत्राला बसला आहे. अर्थसंकल्पातून या क्षेत्राला काय मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
बांधकाम क्षेत्रातील मोठ्या घोषणा
- केंद्र सरकार डेव्हलमेंट फायनान्स इन्स्टिट्यूशन (DFI) संस्थेची स्थापना करणार. यासाठी २० हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याद्वारे अनेक प्रकल्पांना मदत करण्यात येणार आहे.गृहनिर्माण क्षेत्रातील मोठ्या घोषणा
- सर्वांना घर मिळावे यासाठी सरकारचे प्रयत्न
- स्थलांतरीत मजूरांना भाड्याने घरे देण्याचा प्रयत्न
- स्वस्तात घरे बनवणाऱ्या प्रकल्पांना पुढील वर्षी ३१ मार्च २०२२ पर्यंत करातून सूट