नवी दिल्ली - बँक कर्मचारी संघटनांची शिखर संस्था असलेल्या युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (युएफबीयू) १५ मार्चपासून दोन दिवसीय संप पुकारला आहे. दोन सार्वजनिक खासगीकरण करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात बँक कर्मचारी संघटनेने संप पुकारला आहे.
युएफबीयू संघटनेची मंगळवारी बैठक झाली. या बैठकीत दोन दिवसीय संप पुकारण्याचा निर्णय झाल्याचे ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे (एआयबीईए) महासचिव सी. एच. व्यंकटचलम यांनी सांगितले. एलआयसीमधील निर्गुंतवणुकीकरण, जनरल इन्शुरन्स कंपनीचे खासगीकरण, विमा क्षेत्रात ७४ टक्क्यापर्यंत थेट विदेशी गुंतवणुकीला परवानगी अशा विविध निर्णयाबाबत चर्चा करण्यात आल्याची व्यंकटचलम यांनी माहिती दिली.
हेही वाचा-सुरक्षेची खराब मानांकने असलेली वाहने विकू नयेत; केंद्राची कंपन्यांना सूचना
केंद्र सरकारने हे घेतले आहेत खासगीकरणाकरता निर्णय-
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात दोन सार्वजनिक बँकांचे खासगीकरण करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. केंद्र सरकारने निर्गुंतवणुकीचे धोरण स्वीकारलेले आहे. त्यामुळे सार्वजनिक बँकांचे खासगीकरण करण्यात येणार आहे. यापूर्वीच आयडीबी बँकेने एलआयसीला २०१९ मध्ये मोठा हिस्सा विकला आहे. तर गेल्या चार वर्षात १४ सार्वजनिक बँकांचे विलिनीकरण करण्यात आले आहे.
हेही वाचा-इंधनात दरवाढीचा पुन्हा भडका; दिल्लीत पेट्रोल प्रति लिटर ८७ रुपयांहून अधिक