ETV Bharat / business

सरकारी बँकांच्या विलिनीकरणाच्या विरोधात कर्मचाऱ्यांची निदर्शने - Bank employees

केंद्र सरकारच्या विलिनीकरणाला विरोध करत खासगी तसेच सरकारी बँकांमधील कर्मचारी कामबंद आंदोलन करणार आहेत. एआयबीईएचे महासचिव सी.एच.वेंकटचलम म्हणाले, चुकीच्या वेळी बँकांचे विलिनीकरण करण्याच निर्णय घेण्यात आला आहे. त्याचे पुनरावलोकन करण्याची गरज आहे

आंदोलनातील सहभागी बँक कर्मचारी
author img

By

Published : Aug 31, 2019, 7:21 PM IST

चेन्नई - केंद्र सरकारने १० बँकांचे विलिनीकरण करण्याचा निर्णय घेण्याच्या विरोधात बँक कर्मचाऱ्यांची शिखर संघटना एआयबीईए आक्रमक झाली आहे. या संघटनेच्या बँक कर्मचाऱ्यांनी आज जोरदार निदर्शने केली आहेत. यावेळी संघटनेच्यावतीने मोर्चाही काढण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्या विलिनीकरणाला विरोध करत खासगी तसेच सरकारी बँकांमधील कर्मचारी काम बंद आंदोलन करणार आहेत. एआयबीईएचे महासचिव सी.एच.वेंकटचलम म्हणाले, चुकीच्या वेळी बँकांचे विलिनीकरण करण्याच निर्णय घेण्यात आला आहे. त्याचे पुनरावलोकन करण्याची गरज आहे. बँकांचे विलिनीकरण म्हणजे सहा बँका बंद पडण्यासारखे असल्याचा त्यांनी दावा केला. पुढे ते म्हणाले, सरकार बँकांचे विलिनीकरण म्हणू शकते. मात्र अनेक वर्षामध्ये बांधणी व्हायला वेळ लागलेल्या ६ बँका या बँकिंग क्षेत्रामधून अदृश्य होणार आहेत.

हेही वाचा-पंजाब नॅशनल बँकेसह दहा सरकारी बँकांचे विलिनीकरण ; निर्मला सीतारामन यांची घोषणा

जगभरात २००८ मध्ये मंदीचे चित्र होते. त्यावेळी देशातील बँकिंग व्यवस्था ही सरकारी बँकांमुळे सुरक्षित राहिली होती, याची त्यांनी आठवण करून दिली. एआयबीईए संघटनेचे पदाधिकारी हे नवी दिल्लीमध्ये ११ सप्टेंबरला बैठक घेणार आहेत. यामध्ये बँक कर्मचाऱ्यांच्या संपावर निर्णय घेण्यात येणार आहे.

हेही वाचा- गेल्या सात वर्षात अर्थव्यवस्थेची मोठी घसरगुंडी, एप्रिल-जूनदरम्यान ५ टक्के जीडीपी

Intro:Body:

dummy

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.