नवी दिल्ली - कोरोना महामारीच्या संकटात नोकऱ्यांचे प्रमाण कमी झालेले असताना दिलासादायक बातमी आहे. वाहन उद्योगातील नोकऱ्यांसह इतर क्षेत्रातील नोकऱ्यांचे प्रमाण सप्टेंबरमध्ये २९ टक्क्यांनी वाढल्याचे नोकरी डॉट कॉमच्या सर्वेक्षणात दिसून आले आहे.
जून २०२० पासून नोकऱ्यांच्या प्रमाणात सुधारणा होत असल्याचे नोकरी डॉट कॉमने म्हटले आहे. कोरोनाच्या पूर्वीच्या स्थितीशी तुलना केली तर सप्टेंबरमध्ये नोकऱ्यांचे प्रमाण २५ टक्क्यांनी कमी आहे. तर एप्रिलमध्ये नोकऱ्यांचे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत ८० टक्क्यांनी कमी आहे. गेल्या काही महिन्यांत नोकऱ्या देण्याचे प्रमाण वाढले आहे. असे असले तरी ऑगस्टमध्ये नोकऱ्यांचे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत ४२ टक्क्यांनी कमी होते.
या पदासाठी आहेत सर्वाधिक नोकऱ्या
उत्पादन व्यवस्थापक, औद्योगिक अभियंता, विक्री/ व्यवसाय व्यवस्थापक, सेवा व दुरुस्ती देखभाल अभियंता, डिझाईन इंजिनिअर आणि अकाउंटट
या कीवर्डचा सर्वाधिक शोध-
उत्पादक व्यवस्थापक, गुणवत्ता अभियंता आणि विक्री यासाठी कीवर्डसचे शोध घेण्याचे प्रमाण वाढले आहे.
या ठिकाणी आहे नोकऱ्यांचे सर्वाधिक प्रमाण
पुणे (२२ टक्के), दिल्ली (१४ टक्के), चेन्नई (९ टक्के), बंगळुरू (७ टक्के) या शहरांचा एकूण नोकऱ्यांमध्ये ५२ टक्के हिस्सा आहे.