नवी दिल्ली- प्राप्तिकर विभागाने गेल्या आठ महिन्यांत १.४० लाख कोटी रुपयांचा कर परतावा दिला आहे. हा परतावा देशातील ५९.६८ लाख कोटी करदात्यांना १ डिसेंबरपर्यंत देण्यात आला आहे.
प्राप्तिकर विभागाने वैयक्तिक करावर ३८ हजार १०५ कोटींचा परतावा दिला आहे. तर कॉर्पोरेट कर परताव्यावर १.०२ लाख कोटींचा परतावा दिला आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) १ एप्रिल २०२० ते १ डिसेंबर २०२० पर्यंत ५९.६८ लाख कोटी करदात्यांना १ लाख ४० हजार २१० कोटी परतावा दिला आहे. तर प्राप्तिकर परताव्यापोटी ५७ लाख ६८ हजार ९२६ प्रकरणात ३८ हजार १०५ कोटी रुपयांचा परतावा दिला आहे. तर १ लाख ९९ हजार १६५ प्रकरणात १ लाख २ हजार १०५ कोटींचा परतावा दिला आहे. ही माहिती प्राप्तिकर विभागाने ट्विट करून दिली आहे.
हेही वाचा-सीमारेषेवर तणाव असतानाही चीन भारताकडून खरेदी करणार ५ हजार टन तांदूळ; दोन वर्षानंतर होणार आयात
दरम्यान, कोरोना महामारीच्या संकटात चालू आर्थिक वर्षात प्राप्तिकर विभागाने विवरणपत्र भरण्यासाठी सातत्याने वाढ दिली होती. दुसरीकडे केंद्र सरकारच्या प्रत्यक्ष कर संकलनात घट झाली आहे.