नवी दिल्ली - झोमॅटो ही घरपोच अन्नपदार्थ देणारी कंपनी आहे. मात्र या कंपनीने कधी कधी घरचे अन्न खाणे चांगले, असे ट्विट केले. यानंतर चर्चा सुरू झाली, ती कंपनीच्या भविष्यातील नव्या सेवेची! झोमॅटोने घरगुती अन्न घरपोच देण्याच्या सेवेचा शुभांरभ करण्याचे ट्विटमधून संकेत दिले आहेत.
बहुतांश विद्यार्थी, ऑफीसमध्ये काम करणारे कर्मचारी आणि हॉस्टेलमध्ये राहणारे लोक हे हॉटेलपेक्षा घरगुती अन्नपदार्थांना पसंती देतात. झोमॅटोचे ट्विट पाहून याच कंपनीचे संस्थापक आणि सीईओ दिपींद्र गोयल यांनाही आश्चर्य वाटले.
गोयल यांनी त्यावर ट्विटला प्रतिक्रिया देत म्हटले, हे कोणी केले आहे ? चांगले ट्विट केले आहे. @दिपीगोयल घरी बोलवा ना, असे एका वापरकर्त्याने म्हटले आहे. तर घरगुती आचारीचे अन्न घरपोहोच देणाऱ्या सेवेचा शुभारंभ, असे एकाने ट्विट केले आहे.
झोमॅटो ट्विट
झोमॅटोच्या स्पर्धक कंपनीने आधीच केला होम फूडचा शुभांरभ-
झोमॅटोची स्पर्धक कंपनी स्वीग्गीने घरगुती अन्न पोहोचविण्याची सेवा गुरूग्रामध्ये सुरू केली आहे. यामध्ये १ हजारहून अधिक ग्राहक 'स्वॅग्गी डेली' या अॅपमधून सेवा घेत आहेत. या अॅपमधून ग्राहकाला एक दिवस ते एक महिन्यापर्यंत जेवणाचा मेनू निवडता येतो.
यामुळे झोमॅटोवर झाली होती टीका -
तामिळनाडूमधील मदुराई येथे एका डिलिव्हरी बॉयने ग्राहकाला देण्यात येणारे अन्न खाल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर झोमॅटो कंपनी वादाच्या भोवऱयात पडली होती. नुकतेच पुण्यातील एका वकिलाला शाकाहारी अन्न मागवूनही झॉमेटोकडून मासांहारी अन्न दिल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी झोमॅटोला ग्राहक न्यायालयाने ५५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.