ETV Bharat / business

ड्रोनद्वारे ८० किमी प्रति तास वेगाने घरपोहोच फूड, झोमॅटोकडून यशस्वी चाचणी

ग्राहकापर्यंत अन्न पोहोचविण्यासाठी लागणारा सरासरी वेळ ३० टक्क्यांवरून १५ मिनिटापर्यंत करण्यासाठी हवाई मार्ग हा एकमेव पर्याय आहे. वेगवान डिलिव्हरी करण्यासाठी रस्ते कार्यक्षम नाहीत, असे झोमॅटोचे संस्थापक आणि सीईओ दिपिंदर गोयल यांनी म्हटले आहे.

ड्रोन चाचणी
author img

By

Published : Jun 13, 2019, 2:25 AM IST

नवी दिल्ली - ऑनलाईन सेवेतून अन्न मागविल्यानंतर तुमच्या दारात डिलिव्हरी बॉयच्या जागी ड्रोन पार्सल घेवून येणार आहे. ही अविश्वसनीय वाटणारी सेवा लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. कारण ऑनलाईन फूड कंपनी झोमॅटोने ड्रोनद्वारे घरपोहोच अन्न पोहोचविण्याची यशस्वी चाचणी घेतली आहे. त्यासाठी हायब्रीड ड्रोनचा वापर करण्यात आला आहे. ड्रोनने ५ किमीचे अंतर केवळ १० मिनिटात पूर्ण केले. यावेळी ड्रोनचा वेग ताशी ८० किमी प्रति तास एवढा होता.

नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने मान्यता दिल्यानंतर झोमॅटोने गेल्या आठवड्यात दुर्गम भागात ड्रोनची यशस्वी चाचणी घेतली होती. त्यासाठी ड्रोनची खास रचना करण्यात आली होती. मात्र घेण्यात आलेल्या चाचणी कुठे घेण्यात आल्या याबाबतची अधिक माहिती कंपनीने दिली नाही.

ड्रोनद्वारे ग्राहकापर्यंत अन्न पोहोचविणे हा वेगवान पर्याय-

नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने १३ मे रोजी ड्रोनसाठी इच्छुक असलेल्या कंपन्यांकडून अर्ज मागविले होते. ग्राहकापर्यंत अन्न पोहोचविण्यासाठी लागणारा सरासरी वेळ ३० टक्क्यांवरून १५ मिनिटापर्यंत करण्यासाठी हवाई मार्ग हा एकमेव पर्याय आहे. वेगवान डिलिव्हरी करण्यासाठी रस्ते कार्यक्षम नाहीत, असे झोमॅटोचे संस्थापक आणि सीईओ दिपिंदर गोयल यांनी म्हटले आहे. पुढे ते म्हणाले की, शाश्वत आणि सुरक्षित तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी काम करत आहोत. त्यासाठी पहिली यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. ड्रोनद्वारे अन्न पोहोचविणे (फूड डिलिव्हरी) हे आता स्वप्न राहिलेले नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

झोमॅटोकडून ड्रोनची यशस्वी चाचणी

ड्रोन सेवा ठरणार गेम चेंजर-

हायब्रीडच्या प्रकारच्या ड्रोनमध्ये ५ किलोपर्यंतचे अन्न घेवून जाता येते. ड्रोन पूर्णपणे स्वयंचलित आहे. झोमॅटोकडून प्रत्येक ड्रोनची सुरक्षेसाठी चाचणी घेण्यात येत आहे. ड्रोन सेवेसाठी झोमॅटोने 'टेकइगल' ही लखनौमधील ड्रोन स्टार्टअप कंपनी ताब्यात घेतली आहे. सध्या दुचाकीवरून ग्राहकापर्यंत अन्न पोहोचविण्यासाठी कंपनीला ३० मिनिटे लागत आहेत. रस्त्यावरील वाढती वाहतूक, अरुंद रस्ते आणि प्रदूषण याचा विचार करता ड्रोनद्वारे अन्न पोहोचविण्याची सुविधा महानगरांसाठी 'गेम चेंजर' ठरणार आहे.

Intro:Body:

biz

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.