ETV Bharat / business

शिओमी तामिळनाडूत सुरू करणार देशातील सातवा उत्पादन प्रकल्प - स्मार्टफोन

स्मार्टफोन निर्मितीचा नवा प्रकल्प सुरू करत असल्याची घोषणा करायला आनंद होत असल्याचे शिओमीचे मुख्य अधिकारी मुरलीकृष्णन बी. यांनी सांगितले

प्रतिकात्मक
author img

By

Published : Mar 19, 2019, 5:35 PM IST

नवी दिल्ली - चिनी स्मार्टफोन कंपनी शिओमीने देशातील सातवा उत्पादन प्रकल्प सुरू करण्याचे जाहीर केले आहे. हा प्रकल्प तामिळनाडूमध्ये उभारण्यात येणार आहे. त्यासाठी फ्लेक्स लिमिटेड कंपनीबरोबर शिओमीने करारही केला आहे.

स्मार्टफोन निर्मितीचा नवा प्रकल्प सुरू करत असल्याची घोषणा करायला आनंद होत असल्याचे शिओमीचे मुख्य अधिकारी मुरलीकृष्णन बी. यांनी सांगितले. हा प्रकल्प म्हणजे भारताशी बांधिलकीचा भाग असल्याचे त्यांनी म्हटले आहे. देशातील सहा स्मार्टफोनच्या उत्पादन प्रकल्पासाठी फोककॉन्न आणि हायपॅडबरोबर भागीदारी करण्यात आली आहे. या नव्या उत्पादन प्रकल्पात एका सेकंदाला तीन स्मार्टफोन तयार करण्याची क्षमता आहे.

Intro:Body:

Xiaomi launches 7th manufacturing plant in India

शिओमी तामिळनाडूत सुरू करणार देशातील सातवा उत्पादन प्रकल्प 

नवी दिल्ली - चिनी स्मार्टफोन कंपनी शिओमीने देशातील सातवा उत्पादन प्रकल्प सुरू करण्याचे जाहीर केले आहे. हा प्रकल्प तामिळनाडूमध्ये उभारण्यात येणार आहे. त्यासाठी फ्लेक्स लिमिटेड कंपनीबरोबर शिओमीने करारही केला आहे. 

स्मार्टफोन निर्मितीचा नवा प्रकल्प सुरू करत असल्याची घोषणा करायला आनंद होत असल्याचे शिओमीचे मुख्य अधिकारी मुरलीकृष्णन बी. यांनी सांगितले. हा प्रकल्प म्हणजे भारताशी बांधिलकीचा भाग असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

देशातील सहा स्मार्टफोनच्या उत्पादन प्रकल्पासाठी फोककॉन्न आणि हायपॅडबरोबर भागीदारी करण्यात आली आहे. या नव्या उत्पादन प्रकल्पात एका सेकंदाला तीन स्मार्टफोन तयार करण्याची क्षमता आहे. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.