ETV Bharat / business

शाओमीचा ५ हजार एमएएच बॅटरी क्षमतेचा रेडमी ८ ए लाँच; जाणून घ्या, स्मार्टफोनची किंमत - Anuj Sharma

रेडमीचा ८ ए स्मार्टफोन (२ जीबी+३२ जीबी) हा ६ हजार ४९९ रुपयांना उपलब्ध असणार आहे. तर ३ जीबी+ ३२ जीबीचा स्मार्टफोन हा ६,९९९ रुपयांना मिळणार आहे. रेडमी ८ए एमआय डॉट कॉम आणि फ्लिपकार्टवर २९ सप्टेंबरपासून उपलब्ध असणार आहे.

संग्रहित - रेडमी
author img

By

Published : Sep 25, 2019, 7:42 PM IST

बंगळुरू - सणाच्या मुहुर्तावर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी चिनी स्मार्टफोन कंपनी रेडमीने ८ए स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनची भारतात किंमत ६ हजार ४९९ पासून पुढे आहे.

रेडमीचा ८ए स्मार्टफोन (२ जीबी+३२ जीबी) हा ६ हजार ४९९ रुपयांना उपलब्ध असणार आहे. तर ३ जीबी+ ३२ जीबीचा स्मार्टफोन हा ६,९९९ रुपयांना मिळणार आहे. रेडमी ८ए एमआय डॉट कॉम आणि फ्लिपकार्टवर २९ सप्टेंबरपासून उपलब्ध असणार आहे.

हेही वाचा-पेट्रोल-डिझेलच्या खरेदीवर क्रेडिट कार्डद्वारे मिळणारी सवलत १ ऑक्टोबरपासून बंद

शाओमी इंडियाचे मुख्य विपणन अधिकारी अनुज शर्मा यांनी रेडमी ८ चा उच्च दर्जा करण्यासाठी खूप मेहनत घेण्यात आल्याचे सांगितले. पी२आयचे नॅनो कोटिंग आणि गोरिला ग्लास ५ देण्यात येणार आहेत. एमआय फॅनसाठी उत्कृष्ट वैशिष्ट्यासह कमी किंमतीत स्मार्टफोन असणार आहे.

हेही वाचा-मुकेश अंबानी सलग आठव्या वर्षी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, पाहा एवढी आहे संपत्ती

हे आहेत वैशिष्ट्ये-
रेडमी ८एला ६.२२ इंचचा डॉट नॉच एचडी + डिस्प्ले असणार आहे. मोबाईलला १२ मेगा पिक्सेल सोनी आयएमएक्स ३६३ सेन्सर आहे. त्यासोबत ड्युअल पिक्सेल ऑटोफोकस आहे. मोबाईलला ८ मेगा पिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आहे. दोन्ही कॅमेराच्या एआय पोट्रेट मोडमधून फोटो काढणे शक्य होणार आहे. या किमतीच्या श्रेणीत पहिल्यांदाच लवकर चार्जिंग होणारे यूएसबी टाईप-सी १८ डब्ल्यू देण्यात येणार आहे. मोबाईलला ५ हजार एमएएचची दणकट बॅटरी आहे.

Intro:Body:

business news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.