नवी दिल्ली - केंद्र सरकार एजीआरच्या थकित शुल्काची वसुली करण्याकरता दूरसंचार कंपन्यांना दिलेली बँक हमी काढून घेण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर व्होडाफोन आयडियाचे चेअरमन कुमारमंगलम बिर्ला यांनी आज दूरसंचार मंत्रालयाचे सचिव अंशु प्रकाश यांची भेट घेतली आहे.
कुमारमंगलम बिर्ला यांनी दूरसंचार मंत्रालयाच्या सचिवांच्या भेटीत काय चर्चा केली याची सविस्तर माहिती अद्याप समोर आली नाही. दूरसंचार विभागाच्या आकडेवारीनुसार व्होडाफोन आयडियाकडे एजीआरचे ५३,००० हजार कोटी रुपये थकित आहेत. कंपनीने २,५०० कोटी रुपये दूरसंचार विभागाकडे भरले आहेत. तर शुक्रवारी १ हजार कोटी रुपये देणार आहे.
हेही वाचा-हिरो मॉटोकॉर्प संशोधनात करणार १० हजार कोटींची गुंतवणूक
सरकारकडे बँक हमीची दिलेली रक्कम जप्त करू नये, अशी व्होडाफोन आयडियाने सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली होती. एजीआर प्रकरणात कोणताही सरकारकडून दिलासा मिळाला नसल्याने बिर्ला यांनी चिंता व्यक्त केल्याचे सूत्राने सांगितले.
हेही वाचा-गुगलच्या ब्रेकनंतरही रेल्वे स्थानकांवरील वायफाय राहणार 'सुस्साट'